पावसाने दिली उघडीप , कसे कराल कांद्याचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांमध्ये पडलेला पाऊस आणि दाट धुके यामुळे रब्बी पिकांसह फळबागांच्यावरही मोठा परिणाम झाला आहे. रब्बीतील कांदा पीक आडवे झाले आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणातील बदलाने आणि पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव तर वाढतोच पण कांद्याची पात पिवळी पडली असेल तर तो बुरशीचा प्रादुर्भाव आहे. या दोन रोगाचाच कांदा पिकावर अधिक प्रमाणात मारा झालेला आहे. यामुळे कांद्याच्या पाती जमिनीलगत झुकलेल्या पाहवयास मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे याची माहिती घेणार आहोत.

पावसाच्या उघडीपनंतर काय करावे?
–पावसाने उघडीप दिली की, लागलीच फवारणी न करता आगोदर पावसाचा अंदाज घेणे गरजेचे आहे.
–अन्यथा फवारणीनंतर पाऊस झाला तर शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा असे दोन्हीही वाया जाणार आहे.
–शिवाय पावसाने उघडीप दिली की, त्याच दिवशी फवारणी करणे तसे धोक्याचेच आहे. पावसामुळे जमिनीत पाणी अधिकचे झाल्याने औषधांचा कांद्यावर परिणामच होत नाही.
–त्यामळे दोन दिवसानंतरच फवारणी केली तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.

कांदा पिकाचे असे करा व्यवस्थापन
लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हे पीक कमी कालावधीचे असून रोगाचा प्रादुर्भाव झाला तर थेट परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे बुरशीनाशकाचा वापर करणे हे अनिवार्यच राहणार आहे. पावसानंतर जे लिक्विड स्वरुपात बुरशीनाशक बाजार उपलब्ध आहेत त्यांचाच वापर फायद्याचा राहणार आहे. यामध्ये झोल ग्रुपचे बुरशीनाशक अधिकेचे परिणामकारक राहणार आहेत.

या औषधांची करा फवारणी
–कांदा लागवड करुन दोन महिन्याचा कालावधी झाला असेल तर बुरशीनाशक म्हणून अॅडक्झेर हे औषध प्रभावी राहणार आहे.
–15 लिटर पंपासाठी 30 मिली औषेध पाण्यात मिसळावे लागणार आहे.
–या मिश्रणात एक एकरामधील फवारणी होणार आहे. तर बीएसएफ चे ओपेरा हे एक बुरशीनाशक महत्वाचे ठरणार आहे.
–याचे प्रमाण देखील अॅडेक्झेर प्रमाणेच ठेवावे लागणार आहे.
–कांद्यावर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर मात्र, किडनाशक आणि बुरशीनाशक हे एकत्रित फवारणे गरजेचे असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!