संचारबंदीच्या काळातही भारतीय तांदळाला परदेशातून चांगली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | भारतातील पंजाब, हरियाणा या राज्यात बासमती तांदळाचे चांगले उत्पादन घेतले जाते. बासमती तांदळाच्या उत्पादकांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. पंजाब, हरियाणा या राज्यात उत्पादित होणाऱ्या बासमती तांदळाला दक्षिण आशियातील नेदरलँड, बेल्जिम या देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादना सोबत उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.  या तांदळाच्या निर्यातीमध्ये जवळपास ६०% नी वाढ झाली आहे.  आणि विशेष म्हणजे ही वाढ आर्थिक वर्षाच्या पहिल्या ८ महिन्यातील आहे. ज्या काळात संचारबंदी करण्यात आली होती. या काळात नेदरलँडनेही आपली आयात वाढवली आहे. युरोपियन देशातून होणाऱ्या या मागणीमुळे भारतातील बासमती उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न बऱ्यापैकी वाढले आहे.

बासमती तांदळाच्या प्रतवारी ११२१ पुसा या वाणाची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते आहे. तर नोव्हेंबर महिन्यापासून या प्रतवारीला चांगाला दर मिळतो आहे. सध्या  युरोपातील ग्राहक सुगंधित बासमती तांदुळ ज्याला आपण सुशी, रिझोटो असे म्हणतो या वाणाकडे अधिक आकर्षित होत आहेत. युरोप ही या तांदळासाठीची मोठी बाजारपेठ आहे. या वर्षी कोविड च्या साथीच्या काळातही युरोपातील ग्राहकांनी आपल्या घरगुती वापरासाठी बासमती तांदळाची मोठी खरेदी केली असल्याचे बासमती तांदळाचे व्यापारी सांगतात.

दक्षिण- पुर्व अशियन लोकांनी मोठ्या प्रमाणात बासमतीची खरेदी केली आहे. दरम्यान कोविड-१९ च्या नवीन स्ट्रेनची भीती युरोपयीन लोकांच्या मनात असल्याने या स्ट्रेनमुळे पुन्हा संचारबंदी लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे लोक परत बासमतीची खरेदी मोठ्या प्रमाणात करतील अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्ती केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!