खुशखबर…! कापसाच्या दरात वाढ , जाणून घ्या कुठे किती भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारपेठेत सध्या कापसाला चांगली मागणी आहे. लातूर बाजार समितीत सप्टेंबर मध्ये कापसाचे दर5200 रुपये प्रतिक्विंटल होता मात्र हाच दर आज 9200 च्या घरात जाऊन पोहचला आहे. याबरोबरच मागणीत वाढ आणि त्यामानाने पुरवठा कमी होत असल्याने भविष्यात कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता ही आनंदाची बाब आहे.

यंदा पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. शिवाय कापसाचे क्षेत्रही घटले होते. असे असताना आता जगभरातून कापसाची मागणी होत आहे. उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने कापसाच्या दरात वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची गडबड न करता टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायद्याचे राहणार असल्याचा सल्ला महेश सारडा कॅाटन असोसिएशनचे अध्यक्ष यांनी एका ट्विव्ही माध्यमाशी बोलताना दिला आहे.

उत्पादनात झाली घट

देशातही उत्तर भारतात कापूस हंगाम संपला आहे. उत्तर भारतासह मध्य भारतात कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्र, गुजरातमध्ये अतिपावसाने कापूस पिकाची मोठी हानी झाली. यामुळे कापसाचे उत्पादन देशात 335 ते 340 लाख गाठी एवढेच येवू शकते, असाही अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. पावसामुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे पण यंदा मराठवाड्यात कापसाचे क्षेत्रही घटले होते. केवळ मराठवाड्यातच नाही तर देशभर हेच चित्र आहे. त्याचा परिणामही उत्पादनावर झालेला आहे.

इतर बाजार समितीत कापूस भाव

दरम्यान गोड पिंपरी बाजार समितीत किमान 7975 तर कमाल भाव 7810 सरासरी किंमत सात हजार आठशे पंचवीस आहे. नागपूर येथील उमरेड कापूस बाजार येथे किमान भाव 8500 तर कमाल भाव 8300 सरासरी भाव आठ हजार चारशे रुपये आहेत. नांदेड येथील बाजारात कापूस भाव किमान 8500 कमाल 8300 सरासरी किंमत 8400, हिंगणगाव बाजार समितीत 8455 किमान भाव 60950 कमाल भाव तर सरासरी किंमत आठ हजार दोनशे इतकी आहे . सेलू येथे 8425 कमाल 8000 तर सरासरी किंमत आठ हजार तीनशे इतकी आहे

Leave a Comment

error: Content is protected !!