सोयाबीनच्या कमाल दरात वाढ , शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा , पहा आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनचे दर समाधानकारक असल्याचे पहायला मिळत आहेत. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना सोयाबीनचा कमाल भाव 7500 रुपयांच्या वर गेला आहे. आजचे सोयाबीन बाजारभाव पहिले असता सोयाबीनला कमाल 7600 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज गंगाखेड बाजार समितीत 43 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 7300, कमाल भाव 7600 आणि सर्वसाधारण भाव 7300 रुपये प्रतिक्विंटल करिता मिळाला आहे.

मालाची साठवणूक की विक्री ?
सोयाबीन बाजारातील परिस्थिताती सुधारली असून सोयाबीनच्या कमाल दरात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी आपला शेतमाल यापूर्वीच विकला आहे. तर काही शेतकऱ्यांनी अद्यापही चांगल्या भावाची प्रतीक्षा करीत सोयाबीनची साठवणूक केली आहे. त्यामुळे आता माल विकायचा की साठवणूक करायची ? शेतकरी काय निर्णय घेणार हे पहावे लागेल. कारण आता लवकरच उन्हाळी सोयाबीनची देखील बाजारात आवक होईल. यंदा केवळ बियाणापुरते नाही तर उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला होता. हे सोयाबीन जोमात असून लवकरच याची आवक सुरु होणार आहे. त्यामुळे खरिपातील साठवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी आता विकले तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 8-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/04/2022
लासलगावक्विंटल1189389074007311
माजलगावक्विंटल220530070756951
राहूरी -वांबोरीक्विंटल32690170006950
संगमनेरक्विंटल8728072807280
सिल्लोडक्विंटल8700070807050
उदगीरक्विंटल4900725073167283
कारंजाक्विंटल4500695074107275
परळी-वैजनाथक्विंटल1200675173517201
रिसोडक्विंटल2500675073507100
वैजापूरक्विंटल70690072007050
राहताक्विंटल12727673007288
सोलापूरलोकलक्विंटल96400072557150
नागपूरलोकलक्विंटल764645073827149
कोपरगावलोकलक्विंटल412680072867225
मेहकरलोकलक्विंटल1240650074007000
जालनापिवळाक्विंटल1851600075007250
अकोलापिवळाक्विंटल1408675072557000
यवतमाळपिवळाक्विंटल1263650074656987
आर्वीपिवळाक्विंटल270650072857000
चिखलीपिवळाक्विंटल784677574517113
बीडपिवळाक्विंटल148600072206930
जिंतूरपिवळाक्विंटल56715073757200
परतूरपिवळाक्विंटल54700072307121
गंगाखेडपिवळाक्विंटल43730076007300
चांदूर बझारपिवळाक्विंटल48580072006625
देउळगाव राजापिवळाक्विंटल1700070007000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल600660073817250
मंठापिवळाक्विंटल22540071506700
मुरुमपिवळाक्विंटल289674172116976
पुर्णापिवळाक्विंटल20697072507140
उमरखेडपिवळाक्विंटल50620064006300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130620064006300
काटोलपिवळाक्विंटल43420072006500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल165610072506600
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल658600073507250
सोनपेठपिवळाक्विंटल85650171997056

Leave a Comment

error: Content is protected !!