बळीराजा धास्तावला …! रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा धोका ; पुढील चार दिवस महत्वाचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी  खारीप हंगामात जोरदार बरसलेल्या पावसाने आता ऐन रब्बीच्या पेरण्यातही खोडा घातला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातलया बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून कोकणात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या खरिपापाचे नुकसान झाले असून ज्या ठिकाणी रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत त्यावरही संकट ओढवले आहे.

या भागात कमी दबाचे क्षेत्र

दरम्यान बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्ही किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनार्‍यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून पश्चिमेकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. या कमी दाबाच्या क्षेत्राचा पासून उत्तर कोकणात पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून गुरुवारी दिनांक 18 रोजी ही प्रणाली आंध्र प्रदेश तमिळनाडू च्या किनाऱ्याकडे येण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वरील दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

या भागात झाला पाऊस

सोमवारी पंधरा तारखेच्या दुपारनंतर सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यात हलक्‍या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सिंधुदुर्गमधील कणकवलीत 30 मिलिमीटर वेंगुर्ला येथे दहा मिलिमीटर, सोलापुरातील मंगळवेढा, सांगोला येथे दहा मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान 20 अंश यांच्यावर गेला आहे. मंगळवारी सकाळी निफाड येथे नीचांकी 17.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी उच्चांकी कमाल 35 . ७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

पुढील चार दिवस महत्वाचे

हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्यातल्या विविध ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या राज्यातल्या अनेक भागात रब्बीची पेरणी झाली आहे तर काही भागांमध्ये अद्यापही रब्बीच्या लागवडीला सुरुवात करण्यात आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पांढरा कांदा, वाल मूग आदी पिकांची लागवड केली केली आहे. तसेच आंब्याला पालवी फुटण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी राजा हा धास्तावला आहे. आंब्याची पालवी कुजून मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

या जिल्ह्यामध्ये पावसाची श्यक्यता

राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या चा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

Leave a Comment

error: Content is protected !!