शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, 30 जूनपूर्वी करा नोंदणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM किसान )प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपये जमा केला. देशातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेकरिता आतापर्यंत नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही ते शेतकरी अद्यापही या 2000 च्या हप्तापासून वंचित आहेत. आता जर तुम्ही नवीन शेतकरी या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला चार हजार रुपये खात्यामध्ये जमा होऊ शकतील.

पी एम किसान योजनेअंतर्गत घर बसल्या शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्याकरिता http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि तुम्ही पात्रतेत बसत असाल तर या संकेतस्थळावर जाऊन नवीन शेतकरी रजिस्ट्रेशन करू शकता.

देशातील अनेक शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांना दोन हजार रुपयांची ही रक्कम मिळालेली नाही. कारण त्यांनी या योजनेत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं अशा वेळी आता शेतकरी 30 जून पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात यास मंजुरी मिळाली तर एप्रिल जुलैचा हप्ता जुलै मध्ये मिळेल आणि ऑगस्टचा नवीन हप्ता सुद्धा अकाउंट मध्ये येईल म्हणजे दोन्ही हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. एखाद्या शेतकऱ्याने जूनमध्ये नोंदणी केली असेल तर त्याला योजनेचा पहिला हप्ता जुलै मध्ये मिळेल. त्यांना पुढील हप्ता सुद्धा मिळेल जो सरकार सामान्यपणे ऑगस्ट महिन्यात पाठवतो याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा दुहेरी लाभ मिळेल योजनेसाठी रजिस्टर करताच त्यांना चार हजार रुपये मिळतील.

या क्रमांकावर साधा संपर्क 

— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109

–याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) [email protected] यावर देखील संपर्क करू शकता.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment

error: Content is protected !!