सांगलीचे ड्रॅगनफ्रूट थेट परदेशात, केंद्रीय मंत्र्यांकडूनही कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रॅगन फ्रुट या फळाला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या फळांचा उपयोग प्रत्येक देशांत केला जातो. आणि आपले भाग्य की महाराष्ट्र राज्यातील सांगली च्या मातीत उगवलेले ड्रॅगन फ्रुट म्हणजेच ‘कमलम’ या फळाची ची निर्यात चक्क विदेशी देशात होत आहे.

सांगली जिल्ह्यातील तडसर या गावी पिकवण्यात आलेले ड्रॅगन फ्रुट हे दुबई सारख्या देशात निर्यात होऊ लागले आहे. मेसर्स केबीने ड्रॅगन फ्रूटची ही खेप दुबईला भारत सरकार यांच्या एपीएडीए (APEDA) या संस्थेद्वारे मान्यता प्राप्त निर्यातकाला पाठविली आहे.आपल्या महाराष्ट्र राज्यात उगवलेले ड्रॅगन फ्रुट हे उगवले जात न्हवते. सुरवातीला हे फक्त मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स, अमेरिका आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये फक्त ड्रॅगन फ्रूटची ची लागवड केली जात असायची.

पियुष गोयल यांच्याकडूनही कौतुक

तसेच या दरम्यान देशाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर वरून फोटो शेयर करत सांगलीतील या शेतकर्यांचे कौतुक सुद्धा केले आहे. चांगल्या प्रतीच्या फळांमुळे आंतराष्ट्रीय बाजारात निर्यात होत आहे,असे विधान सुद्धा पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांना केले आहे.आपल्या देशामध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड ही 1990 पासून सुरू झाली. सुरवातीला शेतकऱ्यांनी यावर लक्ष्य दिले नाही परंतु वाढत्या मागणीमुळे तसेच योग्य मिळणार मोबादला शिवाय कमी पाण्याची आवश्यकता त्यामुळं ड्रॅगन फ्रुट शेतीकडे शेतकरी धाव घेत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात या फळाला मोठया प्रमाणात मागणी आहे. कारण या फळात तंतूमय पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट असतात. ऑक्सिडेटीवमुळे पेशींचे झालेले नुकसान भरुन काढणे, दाह कमी करणे आणि पाचन व्यवस्था सुधारणे ड्रॅगन फ्रुट हे आरोग्यावर खूप फायदेशीर आहे.त्यामुळे आरोग्य हितासाठी या फळाला आंतराष्ट्रीय बाजारात मोठया प्रमाणात या फळाला मागणी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!