सेंद्रिय शेतीतून त्या दोघा भावांनी केली कोटींमध्ये उलाढाल; जाणून घ्या त्यांची यशोगाथा | Satyajit and Ajinkya Hange

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । पुण्यातील भोदणी येथील सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे या दोन भावांनी  सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी बँकेतील करिअरवर पाणी  सोडले. इतकेच नाहीतर सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी  अनेक उपक्रम  ते राबवत आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये भरघोस उत्पन्न घेत या दोन भावांनी शेतातून तब्बल १२ कोटींची उलाढाल केली. शेतीमध्ये येण्यापूर्वी सुमारे सात ते आठ वर्षे भारताच्या मेट्रो शहरांमध्ये  बँकिंग क्षेत्रात या दोघांनी काम केले. सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे यांनी २०१४ मध्ये स्वता:ची सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी बँकेतील  म्हणून नोकरी सोडली. दोन ब्रदर्स सेंद्रिय फार्म (टीबीओएफ) या नावाने आपला ब्रँड तयार केला आणि यशस्वी सुद्धा करून दाखविला.  Satyajit and Ajinkya Hange

विशेष म्हणजे हे दोन्ही भावांचा  लहानपणासून शेतीशी काही संबंध नव्हता. त्यांनी सांगितले, “आम्हाला सेंद्रिय शेतीचे ज्ञान होते, परंतु आपल्या आसपासचे बरेच लोक सेंद्रिय शेती करत होते. अगदी सुरुवातीला आम्ही पारंपारिक शेती करणाऱ्या भारतभरातील शेतकऱ्यांना भेटलो. सेंद्रिय शेती देशाच्या निरनिराळ्या भागातील काही ठराविक ठिकाणी आहे असे दिसून आले. ती देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पद्धतीने नव्हती. रासायनिक खतांचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम आम्हाला कळले  आणि आम्ही पूर्णतः त्यांचा वापर बंद केला.”  ते त्यांच्या शेतात शेणखत वापरतात. पारंपारिक  शेणखत वापरल्याने जमिनीला सूक्ष्म  पोषक तत्त्वे मिळतात.  एकचपीक घेतल्याने ते  एक विशिष्ट पोषकद्रव्य कमी होण्यास कारणीभूत ठरते, तर बहु-पीक घेण्यामुळे मातीची सुपीकता, मातीचा कण आकार, पाणी धारण क्षमता वाढते आणि शेवटी शेतीच्या जैवविविधतेत वाढ होते. असे दिसून आल्याने त्यांनी विविध पिके घेण्यास सुरुवात केली.  Satyajit and Ajinkya Hange

पपई  हे फळ  त्यांच्या पहिल्या चाचण्यांपैकी एक होते.  हे फळ  बाह्य स्वरुपाने  आकर्षक वाटत नसले तरी त्याची गोडी चांगली असते. तसेच या फळाचे अनेक औषधी गुणधर्म आहे.  सत्यजित सांगतात  “आम्ही आमचा टीबीओएफ ब्रँड विकसित करण्यास सुरुवात केली आणि आमचे उत्पादन मॉल आणि मार्केटमध्ये नेले तसेच आता आम्ही ते ऑनलाइन मार्केटमध्ये विकण्यास सुरुवात केली आहे.” आम्ही सुरुवातीला हातगाड्यांवर आमची सेंद्रिय फळे विकली आणि लोकांना सेंद्रिय उत्पादनांचे महत्त्व पटवून दिले. या कालावधीत आमचा ग्राहक वर्ग वाढला. आम्ही आमची उत्पादने भारताशिवाय जगभरातील ३४ देशांमधील आणि ६६४  शहरांमधील ४५ हजार  ग्राहकांना वितरित करत आहोत. २०१६ मध्ये आमची वार्षिक उलाढाल २ लाख रुपये होती. पण आता वर्षाकाठी साधारणत: १२ कोटींची उलाढाल केली जाते. तूप, गूळ, मिरची  पावडर शेंगदाणा ,लोणी, शेंगदाणा तेल, पारंपारिक गव्हाचे पीठ, ज्वारीचे वाण आणि पौष्टिक भात यांचा संपूर्ण जगात प्रसिद्ध ब्रँड तयार करणे आणि त्यापासुन भरघोस उत्पन्न घेण्यास ते टेक सोल्यूशनवरही काम करत आहेत.  ज्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस, वारा आणि यंत्राशी संलग्न असलेल्या विविध सेन्सरसह इतर घटकांची माहिती मिळेल.”

Leave a Comment

error: Content is protected !!