रब्बी हंगामासाठी वनामकृविचे मराठवाड्यातील आठ केंद्रावर बियाणे झाले उपलब्ध; पहा कोणत्या रब्बी वाणासाठी किती विक्री किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी  | गजानन घुंबरे

खरिप व रब्बी हंगामात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे संशोधीत व विकसीत केलेल्या बियाण्यांना शेतकरी वर्गातून मोठी मागणी असते. प्रत्येक वर्षी १७ सप्टेंबर रोजी आयोजीत रब्बी मेळाव्या पासुन त्यांची विद्यापिठाकडून त्याची उपलब्धता होत असते. यावर्षी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत हा मेळावा झाला नाही. परंतु रब्बी हंगामासाठी आता वनामकृवि कार्यक्षेत्रातील मराठवाड्यात असणाऱ्या बियाणे संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रावर रब्बी बियाणे व त्यांचे संशोधीत वाण विक्रीसाठी शुक्रवार २५ सप्टेंबर पासुन उपलब्ध झाली आहेत. Seeds Price in Marathvada

रब्बी हंगामाकरिता हरभरा, करडई, ज्वारी, जवस, सूर्यफूल या पिकांचे बियाणे साठा उपलब्ध असेपर्यंत विक्रीकरिता खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.

१) रब्बी ज्वारी
वाण- एस.पी.व्ही.- २४०७ (परभणी सुपरमोती)
वाण- एस.पी.व्ही.- १४११ (परभणी मोती)
वाण- सी.एस.व्ही.- १८ (परभणी ज्योती)
_बॅगचे वजन- ०४ किलो
_किंमत- रु.२८०

२) हरभरा
वाण- बी.डी.एन.जी.-७९७ (आकाश)
_बॅगचे वजन-१० किलो
_किंमत-रु.७५०

वाण- बी.डी.एन.जी.-७९८ (काबुली)
_बॅगचे वजन-१० किलो
_किंमत-रु.१०००

३) करडई
वाण- पी.बी.एन.एस- १२ (कुसुम)
वाण- पीबीएनएस- ८६ (पूर्णा)
_बॅगचे वजन- ०५ किलो  Seeds Price in Marathvada
_किंमत- रु.४५०

४) जवस
वाण- एल.एस.एल- ९३
_बॅगचे वजन- ०५ किलो
_किंमत- रु.४००

५) सूर्यफूल
वाण- एल.एस.एफ.एच- १७१ (संकरित)
_बॅगचे वजन- ०२ किलो
_किंमत- रु.७००

Seeds Price in Marathvada यातील काही प्रकारचे बियाणे विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद, बदनापुर (जालना), खामगांव (बीड), तुळजापुर (उस्‍मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्रे तसेच लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र, गोळेगांव (हिंगोली) येथील कृषि महाविद्यालय व परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रात साठा उपलब्ध असेपर्यंत विक्रीला उपलब्ध आहेत. असे वनामकृवि कडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!