संधीचं सोनं करा…! राष्ट्रीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांनी हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. हळदीची निर्यात करण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पोषक वातावरण आहे. निर्यातीसाठी उत्तम संधी आहे. हळदीच्या उत्पादनापेक्षा त्याचे दर त्याच्या मूल्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे सध्या प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादनवाढीची संधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन दादा भुसे यांनी केले आहे. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय हळद परिषदेत बोलत होते.

संधीचे सोने करा …
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत ऑनलाईन राज्यस्तरीय हळद परिषद पार पडली. या दरम्यान, उत्पादन वाढीबरोबर दर्जा सुधारण्याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना या हळद परिषदेच्या माध्यमातून हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीच्या अहवालाची धोरणे आखण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादनही राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. साध्यच्या बाजाराचा विचार करता हळदीचे उत्पादन घटले असून मागणीमध्ये मात्र वाढ झाली आहे. या संधीचे सोने करणे गरजेचे असल्याचे मत भुसे यांनी व्यक्त केले. नगदी पिकांच्या काढणी नंतर होणाऱ्या खर्चावर निर्बंध येणे गरजेचे आहे. यातून खर्च वाचला तरच निर्यातीमधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार असल्याचा सल्ला भुसे यांनी दिला आहे

यावेळी बोलताना अॅड. शिवाजी माने यांनी सांगितले की , परभणी विद्यापीठाकडे हळदीचे 15 वाण आहेत. विद्यापीठाअंतर्गत उत्पादन वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न महत्वपूर्ण असून येथील हळदीला भौगोलिक मानांकन मिळणे गरजेचे आहे. राज्यात सुमारे 5 हजार 500 गावांमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक सहभाग हा हिंगोली जिल्ह्याचा राहिलेला आहे, त्यामुळे येथील हळदीचे वेगळेपण असून मानांकनासाठी योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!