छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती मॅनेजमेंट कसे होते? रयतेसाठी जाहीर केलेल्या योजना एकदा पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अगदी पूर्वीच्या काळापासून भारतात शेती हा देशाचा कणा राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या (Shivaji Maharaj) काळात देखील शेतकरी हा खरा आधार होता. शिवकाळात शेतकरी हा महत्वाचा मनाला जात होता. त्याकाळात शेती हेच अर्थार्जनाचे (Economy) प्रमुख साधन होते. शिवाजी महाराजांनी त्या काळात शेतकऱ्यांचे महत्व ओळखून शेतकऱ्यांसाठी काही योजना राबविल्या होत्या. त्यासाठी शिवाजी महाराजांनी जमिनीची योग्य प्रकारे मोजमाप करून त्या त्या मातीप्रमाणे जमिनीचे प्रकार करत वर्गवारी करून त्यावर पिक पाहणी करण्याची व्यवस्था केली होती आणि त्यावरच सारा आकारला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकर्यां संदर्भात अनेक प्रकारच्या योजना आणि सवलती राबवल्या होत्या त्या त्यांच्या काही पत्रांमधून आपल्याला आजही कौतुकास्पद वाटाव्या अशा आहेत. (shivaji maharaj agriculture policy)

शेती (Agriculture) करणे हे रयतेचे मुख्य बलस्थान आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले होते. संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ जीवनावश्यक साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. शेती पिकली तर रयत सुखी, रयत सुखी तर राजा सुखी हे सूत्र शिवाजी महाराजांना समजले होते. म्हणूनच महाराजांनी शेतकऱ्याला मध्यभागी ठेऊन अनेक शेती उपयोगी योजना आखल्या होत्या. आज आपण शिवाजी महाराजांचे शेती मॅनेजमेंट आणि त्यांनी आखलेल्या योजना याबाबत माहिती घेणार आहोत.

हे तंत्रज्ञान वापरून हायटेक शेतीतून शेतीमधील उत्पन्न करा दुप्पट

शेतकरी मित्रांनो आता शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे खूप गरजेचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप वापरून १ लाख शेतकरी सध्या हायटेक शेती करून अधिक नफा कमवत आहेत. तुम्हीही या शेती उपयोगी मोबाईल अँप च्या मदतीने प्रगतशील शेतकरी बनून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोन देऊन मोठा नफा कमावू शकता. आजच तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला रोज कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला मिळतो. तसेच तुमच्या जवळील सर्व खात दुकानदारांशी तुम्ही या अँपच्या मदतीने संपर्क करून खाते Online मागवू शकता. शिवाय तुमचा शेतमाल अँपवर विक्रीसाठी पोस्ट करून थेट बांधावर शेतमालाची विक्री करू शकता. यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज इथे दिला जातो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचा लाभ घ्या.

१) ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत.
२)शेतकऱ्यास सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे.
३)गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी
३) नवीन शेतकर्यास सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.
४) ज्या शेतकर्यावर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी. त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे.

पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी रयत सज्ज होत त्याकाळी नांगरणी,कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे. बिघा,पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत.तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केल ,यालाच पीक पाहणी असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे.ब्रिटिश शासनाने या पद्धतीची नकल केली आहे.कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत. त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही. प्रजेची,शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार,व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते.

त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या पाठीशी नेहमी उभे होते महाराज. त्यावेळेस जे महाराजांनी शेतीविषयक धोरण आखली ती आजही आपल्याला प्रेरक आणि मार्गदर्शक आहे. शिवरायांनी त्यावेळेस शेतीविषयक बरेच कार्य केले त्या काळात शेती मोजली शेतीमोजणी हा प्रकल्प राबला. तर बरेच लोक म्हणतील जमिनी मोजल्या त्यात मोठे काय, म्हणजे काय ? तर स्वराज्याची सम्पूर्ण जमिनीची मोजणी हि शिवरायानी त्या काळी केली. आणि शेतकरी लागवड, मशागत असेल त्याची नोंद महालेकरी दफतरी यात असायची.

त्या काळी जमीन मोजण्याची पद्धत कशी असत –
एक काठी असायची ती काठी ५ हात व ५ मुठी लांब असायची अश्या २० काठ्यांचा बिघा असत, व अश्या १२० बिघ्याचं चावर असत. अश्या पद्धतीने शेतजमीन मोजण्याचे काम त्याकाळी शिवरायांनी केलं.

शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफ़ी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये हे परिवर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवले ते परिवर्तन आज घडण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार करायला हवा.

Leave a Comment

error: Content is protected !!