धक्कादायक ! शेतकऱ्याच्या दारात रात्रभर बिबट्याचा ठिय्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वन्य प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. मागच्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ झाल्याची घटना आहे. असे असताना पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंगोरीत एका शेतकऱ्याच्या घरासमोर रात्रभर बिबट्याने ठिय्या मंडला होता.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्रीच्या सुमारास पिंगोरी इथल्या बागवस्ती येथे राहणाऱ्या संतोष शिंदे नामक शेतकऱ्याच्या घरासमोर बिबट्याने ठिय्या मांडला होता. घरासमोर झाडीत बिबट्या लपून बसल्याचे शिंदे यांच्या कुटुंबियांना कळाले. त्यामुळे घाबरलेल्या शिंदे कुटुंबीयांनी दार लावून घेतेले व कुटुंबातले कुणीही बाहेर गेले नाही.

त्यांनी खिडकीतून मोठा आवाज केला. दार उघडून काठ्या आपटल्या तरी देखील बिबट्या जगाचा हलला नाही. आता मात्र शिंदे कुटुंबीयांनी या बिबट्याचे चित्रीकरण केले आणि त्याचा व्हिडीओ गावात व्हायरल केला. लोकांची मदत मागितली. शिवाय बिबट्या असलेल्या वाटेवर कुणी येऊ नये असे सांगितले. अखेरीस रात्री उशिरा बिबट्या स्वात:च निघून गेला आणि शिंदे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र अजूनही हे कुटुंब भयभीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!