‘PM किसान सन्मान’ बाबत धक्कादायक बातमी; आता ‘या’ शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो कृषी ऑनलाईन  : ‘PM किसान सन्मान निधी योजना’ ही केंद्र सरकार ची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना आहे. लवकरच या योजनेचा 1o  वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये 2000च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात. मात्र काही अपात्र शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेताना आढळले आहेत. अशा शेतकऱ्यांकडून योजनेची रक्कम वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांना करावे लागणार पैसे परत

या योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची पीएम किसान स्किम अंतर्गत लिस्ट जारी करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पैसे परत करावे लागतील.पीएम किसान योजनेअंतर्गत फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर बिहार सरकारने हा गंभीर मुद्दा मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आपली नोंदणी केली आहे. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांना पैसे परत करावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना पारदर्शक बनवण्यासाठी डीबीटी वेबसाईट बनवण्यात आली आहे. या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्यांना सरकारला पैसे परत करावे लागणार आहे.

अशी आहे अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी

देशातील 42.16लाख अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर महाराष्ट्रातील 4,45,497 अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 358 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान निधी चा लाभ देशात 42.16लाख अपात्र शेतकऱ्यांना घेता असून त्यांच्याकडून सरकार 29.927 कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात असे 4 लाख 45 हजार 497 अपात्र असून ते सरकारचे 358 कोटी रुपये देणे लागतात. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यापूर्वी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अनुदान योजनेचा लाभ एकूण 42 लाख 16 हजार 643 अपात्रांनाही दिला गेला. त्यांच्याकडून 29,927कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाणार आहे. यात सर्वात जास्त शेतकरी आसाम मध्ये 8.35 लाख, तमिळनाडूमध्ये 7. 22 लाख, पंजाब मध्ये 5. 62 लाख आणि महाराष्ट्राचे 4. 45 लाख आहेत.

अशांना मिळत नाही पीएम किसान योजनेचा लाभ

— संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी
— नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य
— केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी
— प्राप्तिकर भरणारे शेतकरी
— 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी
— डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

अशा प्रकारे करा रिटर्न लिस्ट चेक

— या लिस्टमध्ये अपात्रतेत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सम्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या pmkisan.gov.in

— त्यानंतर होम पेजवर अपात्र श्रेणी, शेतकऱ्यांचे नाव, नोंदणी संख्या, लिंग, राज्य, ब्लॉक, जिल्हा, हफ्ता रक्कम, रिफंड मोड आणि बँकेच्या खात्याचे विवरण भरा.

–विवरण नोंदवल्यानंतर यादी स्क्रीनवर दिसून येईल.

— या यादीत आपले नाव आहे का त्याचा शोध घ्या.

–जर यादीत आपले नाव असले तर, योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम परत द्यावी लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!