धक्कादायक…! बोकडाचा नाही तर चक्कं माणसाचा घेतला बळी, काय आहे नेमके प्रकरण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आपल्या देशात आजही रूढी परंपरा आवर्जून पाळल्या जातात. अनेक यात्रा उत्सवामध्ये बोकडाचा बळी देण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. मात्र आंध्र प्रदेशात एका उत्सवादरम्यान बोकडाऐवजी चक्क माणसाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. हे वाचून नक्कीच धक्का बसेल मात्र खरेच हे घडले आहे.

या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील वलसापल्ली गावात संक्रांती निमित्त यल्लम्मा देवीचा उत्सव असतो. या उत्सवाला बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. यंदाच्या वर्षी नेहमीप्रमाणे हा उत्सवाचा बोकडाचा बळी देण्याचा विधी चालू होता. मात्र यावेळी खटक्याने घाव बोकडाच्या मानेवर घालण्याऐवजी जवळ उभ्या असलेल्या माणसाच्या गाळ्यावर घातला. आणि बघता बघता अतिरक्तस्राव होऊन या माणसाचा मृत्यू झाला.

यंदाच्या वर्षी चलापती नावाच्या खाटकाला बोकड कापण्यासाठी निमंत्रित केले होते. हाती आलेल्या माहितीनुसार चलापती नावाचा खाटीक मद्यपानात धुंद होता. सुरेश नावाचा एक गावातील माणूस बोकड कापण्यासाठी चलापती जवळ गेला असता, चलापतीने दारूच्या नशेत बोकड्याचा गळा कापून बळी देण्याऐवजी चक्क सुरेशचा गळा कापला. चलापतीजवळ असलेला सुरा हा चांगला धारदार असल्याने, सुरेशचा जास्त रक्तस्राव झाला. या घटनेनंतर त्याला ताबडतोब रुग्नालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. सर्व गावकऱ्यांनी खटक्याला पोलिसांच्या स्वाधिन केले. याबाबतची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!