बागा वाळू लागल्या ..! ‘शॉट होल बोरर’चा डाळिंबावर प्रादुर्भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सातत्याने बदलते वातावरण आणि अति पावसाचा फटका डाळींब या पिकाला बसला असून मूळकूजवा आणि शॉट होल बोरर या रोगांचा प्रादुर्भाव बागेवर येऊ लागला आहे. त्यामुळे डाळिंबाची झाडे वाळू लागली आहेत. या रोगांमुळे राज्यातील सुमारे पंधरा टक्के बागा बाधित झाल्या आहेत. परिणामी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट ओढवले असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

राज्यात सुमारे एक लाख 50 हेक्टर डाळिंबांची लागवड आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील वातावरणात बदल होत आहे. त्याचा फटका डाळिंब पिकाला बसू लागला आहे. त्यातच अतिपावसामुळे डाळिंब पीक धोक्यात आले आहे तेलकट डाग रोगामुळे अगोदरच डाळिंबाचं मोठे नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादनही घटले आहे. बागा वाचविण्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातून शेतकरी गेल्या वर्षापासून शॉट होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. सांगली, सोलापूर, जिल्ह्यासह नगर जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसत होता. ही कीड अत्यंत लहान छिद्र पडते त्यामुळे ते लक्षात येत नाही. झाडाच्या खोडाच्या खाद्य पुरवठा करणाऱ्या वाहिन्या फुटलेल्या असतात. फुलांचे सेटिंग होईपर्यंत झाड चांगले दिसते पण फळ लागल्यावर वाढू लागतात. झाड पिवळे पडून वाया गेलेले असते. असं शेतकरी सांगतात परंतु प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्वरीत तो दिसत नाही हळू हळू वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत किती हेक्टर वरील डाळिंब पीक वाया गेले याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडे नाही.

राज्यात सध्या 15% मूळकुजवा, शॉट होल बोरर मूळ बागांचे नुकसान झाले आहे. त्यावर डाळिंब संशोधन केंद्रांना संशोधन करून उपाय शोधावेत अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!