…म्हणून कापसाला मिळतोय चांगला भाव ; जाणून घ्या आज किती मिळाला दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला १० हजारहून अधिक दर प्रति क्विंटल साठी मिळतो आहे. असे काय घडले आहे की कापसाचा दर वधारला आहे ? तर त्याचे पहिले कारण आहे ‘आवक’ यंदाच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली आणि हळूहळू ही दोन्ही उत्पादने बाजारात आणली त्यामुळे आवक रोखून धरल्याने कापूस आणि सोयाबीन दर हे चांगले आहेत असे तज्ञांचे मत आहे. सोयाबिनदेखील सध्या ६ हजारांवर खेळतो आहे. त्यामुळे सोयाबिन आणि कापसाच्या दराकरिता शेतकऱ्यांचे धोरण महत्वाचे ठरले आहे.

कापसाच्या बाबतीत विचार करायचं झालं तर शेतकरी सहकारी जिनिंग प्रोसेस मध्ये दररोज सरासरी 700 ते 800 क्विंटल कापसाची आवक होत असून गतवर्षी हे प्रमाण तिप्पट चौपट होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कापसाला उतारा बघून भाव दिला जातो. एक क्विंटल मध्ये 35 ते 36 किलो रुई चा उतारा येतो तर 62 63 किलो सरकी निघते. रुई व सरकी चे प्रमाण प्रति क्विंटल मध्ये 35 ते 65 असे असायला पाहिजे खरीदार हे प्रमाण बघून भाव निश्चित करीत असे. उतारा काढताना पाच क्विंटल मध्ये एक गाठ असा काढण्यात येतो व त्यास खर्च येतो आठशे रुपये या खर्चात त्याला क्विंटल मागे 62 किलो सरकी व 35 किलो रुई मिळते. रुईला दोनशे रुपये किलो तर सरकीला 40 किलो भाव घाऊक बाजारात आहे. या सर्वाचा पूर्ण लाभ जिनिंग प्रोसेस चालवणाऱ्या खरेदीदारांना होतो. फायद्याचे हे अर्थकारण शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी खरेदीदारांना अडवून भाव वाढ होण्यास भाग पाडले. त्यामुळे सध्या कापसाला चढे दर मिळू लागलेत.

अवकाळीचा कापसाला फटका

यंदाच्यावर्षी अवकाळी पावसाने मोठा खोडा घातला. ढगाळ वातावरण पाऊस यामुळे कापूस पिकामध्ये बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिकाची उत्पादकता सरासरी ३०-४० टक्क्याने घसरली असा कृषी खात्याचा अहवाल आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कापसाच्या एकूण आवकेवर झाला. आवक कमी असल्याने भावात वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे.

आजचे 06/01/2022 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2022
अमरावतीक्विंटल95950097009600
हिंगोलीक्विंटल40954996999624
सेलुक्विंटल36218100100009840
किनवटक्विंटल413810098109700
आष्टी- कारंजाक्विंटल210950096509600
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल320960097009650
जामनेरहायब्रीडक्विंटल136800090258500
अकोलालोकलक्विंटल37960096009600
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल1449200100009800
देउळगाव राजालोकलक्विंटल3000925096359450
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल1100880094609400
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2800900098219500

Leave a Comment

error: Content is protected !!