Soyabean Rate Today: खुशखबर ! अखेर सोयाबीन दराने ओलांडला 6000 रुपयांचा टप्पा; बघा किती मिळाला कमाल दर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या दोन आठवड्यांपासून सोयाबीन (Soyabean Rate Today) बाजारामध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सोयाबीन 5800 चा टप्पा गाठला होता. मात्र आजच्या आठवड्याची सुरुवात ही चांगली झालेली दिसून येत आहे.

आज आठवड्याच्या सुरुवातीला सायंकाळी सहा वाजता प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीयांमधील सोयाबीन बाजारभावानुसार सोयाबीन कमाल सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6300 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला आहे.

आज चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4900 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 4500, कमाल भाव सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण भाव 5400 इतका मिळाला आहे. सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती इथे 6,051 कमाल दर मिळाला असून आज बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीन (Soyabean Rate Today) ची 1044 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव ५२०२ कमाल भाव 6,051 आणि सर्वसाधारण भाव 5702 इतका मिळाला आहे.

याबरोबरच उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार रुपयांचा कमाल दर मिळालाय. तर मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6,041 रुपयांचा कमाल दर आज मिळालाय. याबरोबरच शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील 6000 रुपयांचा कमाल दर आज सोयाबीनला (Soyabean Rate Today) मिळाला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6000 रुपयांचा कमाल भाव मिळालाय. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6005 रुपये दर कमाल मिळालेला आहे. शिवाय परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5925 रुपयांचा कमाल दर आज मिळालेला आहे. तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5940 रुपयांचा कमाल दर आज सोयाबीनला मिळालेला आहे.

शिवाय सोयाबीनची (Soyabean Rate Today) मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1792 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली असून ही आवक आजची सर्वाधिक आवक आहे तर आज या बाजार समितीमध्ये 5,601 रुपयांचा किमान दर मिळालाय कमाल दर 6,153 रुपये मिळाल्या तर सर्वसाधारण दर पाच हजार 980 रुपये इतका मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव (Soyabean Rate Today)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/11/2022
लासलगाव क्विंटल 2441 4000 5940 5780
लासलगाव – विंचूर क्विंटल 2704 3000 5858 5600
जळगाव क्विंटल 218 4500 5300 5100
औरंगाबाद क्विंटल 356 4500 5621 5060
सिल्लोड क्विंटल 190 5000 5600 5400
परळी-वैजनाथ क्विंटल 2900 5000 5925 5750
सेलु क्विंटल 200 4900 5760 5537
तुळजापूर क्विंटल 1150 5750 5750 5750
मोर्शी क्विंटल 1020 5500 5818 5657
धुळे हायब्रीड क्विंटल 6 5270 5670 5505
सोलापूर लोकल क्विंटल 799 4000 5900 5700
नागपूर लोकल क्विंटल 5372 4650 5611 5371
अमळनेर लोकल क्विंटल 40 5400 5561 5561
हिंगोली लोकल क्विंटल 2000 5199 6005 5602
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 100 3948 5730 4381
ताडकळस नं. १ क्विंटल 392 4000 5600 5000
लातूर पिवळा क्विंटल 17992 5601 6153 5980
जालना पिवळा क्विंटल 16409 3900 6000 5300
अकोला पिवळा क्विंटल 7586 4400 5665 5300
यवतमाळ पिवळा क्विंटल 2765 5000 5740 5370
आर्वी पिवळा क्विंटल 1340 5000 5860 5400
चिखली पिवळा क्विंटल 4900 4500 6300 5400
अक्कलकोट पिवळा क्विंटल 347 5600 6000 5800
कळमनूरी पिवळा क्विंटल 40 5000 5000 5000
वर्धा पिवळा क्विंटल 479 5150 5805 5650
भोकरदन पिवळा क्विंटल 70 5000 5600 5300
भोकर पिवळा क्विंटल 331 4500 5719 5109
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 1210 5000 5800 5400
मलकापूर पिवळा क्विंटल 1446 4250 5900 5250
सावनेर पिवळा क्विंटल 45 5397 5700 5550
शेवगाव पिवळा क्विंटल 8 5300 6000 6000
गेवराई पिवळा क्विंटल 504 5000 5700 5350
परतूर पिवळा क्विंटल 789 5176 5700 5500
गंगाखेड पिवळा क्विंटल 26 5100 5850 5600
साक्री पिवळा क्विंटल 15 4700 5000 4900
धरणगाव पिवळा क्विंटल 12 5175 5500 5500
नांदगाव पिवळा क्विंटल 122 4500 5640 5150
मंठा पिवळा क्विंटल 230 4500 5651 5400
किनवट पिवळा क्विंटल 111 5100 5450 5250
मुरुम पिवळा क्विंटल 484 5000 6041 5520
उमरगा पिवळा क्विंटल 119 5000 6000 5800
पुर्णा पिवळा क्विंटल 876 5000 5851 5651
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 130 5000 5900 5550
पांढरकवडा पिवळा क्विंटल 175 5000 5675 5600
उमरखेड पिवळा क्विंटल 340 4800 5000 4900
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 230 4800 5000 4900
बाभुळगाव पिवळा क्विंटल 1300 4900 5715 5320
भंडारा पिवळा क्विंटल 92 4800 5190 5050
चिमुर पिवळा क्विंटल 60 4500 4600 4550
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 355 4400 5715 5250
पुलगाव पिवळा क्विंटल 196 4780 5600 5375
सिंदी पिवळा क्विंटल 773 4360 5620 4900
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 500 4800 5500 5250
सोनपेठ पिवळा क्विंटल 1044 5202 6051 5702
error: Content is protected !!