सोयाबीन बाजारात सकारात्मकता…! आवक आणि दर दोन्ही वाढले; पहा कुठे किती भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपामध्ये घेतलेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा याची आशा मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना लागल्या आहे. थोडे थांबले तर सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेवर सोयाबीनच्या साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे मात्र आता सोयाबीनच्या दराबाबत लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काहीशा सकारात्मक हालचाली घडताना पाहायला मिळत आहे. शनिवारी सोयाबीनला पोटलीमध्ये 5350 चा दर मिळाला होता. मुहुर्ताच्या दरानंतर हा सर्वाधिक दर मानला जात आहे. अशी वाढ होत गेली तर शेतकऱ्यांना अपेक्षित दर प्रत्यक्षात मिळेल आणि झालेले नुकसान भरुन काढण्यास हातभार लागेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सलग दोन दिवस वाढले दर

दिवाळीनंतर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र, शुक्रवारपासून दरात सुधारणा होत आहे. शुक्रवारी पोटलीत 5250 तर आज (शनिवारी) 5350 चा दर मिळालेला आहे. आतापर्यंत दर स्थिर राहिले तरी समाधान व्यक्त केले जात होते. पण आता दर दिवसागणिस वाढत असल्याने शनिवारी आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 11 हजार हा मुहूर्ताचा दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या होत्या. योग्य दर मिळत नाही तोपर्यंत मालाची साठवणूक करण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला होता.

टप्प्याटप्प्याने आवक होणे गरजेचे

शनिवारी सोयाबीनला सौद्यामध्ये 5630 चा भाव निघाला होता. मात्र, पोटलीत 5350 दर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळालेला आहे. मात्र, हाच दर टिकवून ठेवायचा असेल तर सोयाबीनची आवक एकदम न वाढू देता टप्प्याटप्प्याने आवक होणे गरजेचे आहे. आता 16 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. यापेक्षा अचानक आवक वाढली तर दर कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे आवक याच प्रमाणात राहणे तेवढेच महत्वाचे आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6100 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5950 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 5200, चना मिल 4850, सोयाबीन 5630, चमकी मूग 7200, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7150 एवढा राहिला होता.

सोयाबीनचे बाजारभाव (१२-११-२१)

–अहमदनगर किमान 4500- कमाल 5361 सरासरी- 4930

— अहमदनगर कोपरगाव किमान 4000- कमाल 5465- सरासरी ५३२०

–अहमदनगर राहुरी बांबोरी किमान 4700- कमाल 5250- सरासरी 5201

— अमरावती मोर्शी किमान 4900- कमाल 5350 -सरासरी 5125.

— औरंगाबाद पैठण किमान 5175- कमाल ५२०१- सरासरी 5181

— वर्धा सिंधी सेलू किमान 4950- कमाल 5600 -सरासरीत 5350

–यवतमाळ कळंब किमान ५१०० -कमाल ५५००- सरासरी 5300

–वाशिम रिसोड किमान 4700- कमाल 5450 -सरासरी ५100

— सोलापूर किमान 4590- कमाल 5365- सरासरी 5150

–पुणे बारामती किमान 4500- कमाल 5351- सरासरी 5200

— परभणी जिंतूर किमान ४८००- कमाल ५४००- सरासरी 5100

— परभणी गंगाखेड किमान 5000 – कमाल 5280 -सरासरी 5100

— उस्मानाबाद उमरगा किमान ४६०० -कमाल ५२५० -सरासरी 5175

Leave a Comment

error: Content is protected !!