सोयाबीन दराची घसरणच…उडिदाने मात्र दिला आधार ; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासूनचा विचार करता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. पीकामध्ये पावसाचे पाणी साचले असतानीही पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरुच होती. मात्र पुन्हा पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.

यंदा सर्वकाही पाण्यात

मागील दोन दिवसांपासून उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, सोलापूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झालेले आहे. त्यामुळे काढणी कामे रखडलेली आहेत. शिवाय काढणी करुन लावण्यात आलेल्या गंजीचेही पावसामुळे नुकसान होत आहे. खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते मात्र, यंदा सर्वकाही पाण्यात असल्याने आगामी रब्बी हंगामाची तयारी तरी करावी कशी असा प्रश्न उपस्थित होते आहे. यंदाच्या हंगामात पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे.

उडदाला 7300 चा दर

दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पीकातून भरघोस उत्पन्न पदरी पडत असते. यंदा मात्र, वावरातले पीक अजूनही बाजारपेठेत आलेले नाही. तर उडदाची काढणी ही पावसाला सुरवात होण्यापूर्वीच झालेली होती. त्यामुळे उडदाचा आधार शेतकऱ्यांना मिळालेला आहे. सध्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला 7300 चा दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. तर आता आवक कमी झाली असल्याने पुन्हा दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आवक वाढली तर दर कमी होणार हे बाजाराचे सुत्र आहे. पण सोयाबीनच्या बाबतीत असे होताना पाहवयास मिळत नाही. सोयाबीनची आवक 3 हजार क्विंटलने घटूनही शनिवारी 100 रुपयांनी दर हे कमी झाले होते. त्यामुळे काढणी-मळणी करूनही शेतकऱ्यांना सोयाबीन हे पचनी पडलेले नाही. शनिवारी सोयाबीनला 5600 चा दर मिळालेला होता.

इतर शेतीमालाचे दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6600 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6370 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6300 रुपये क्विंटल, जानकी चना 5001 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4850 , सोयाबीन 6351, चमकी मूग 7007 , मिल मूग 6500 तर उडीदाचा दर 7280 एवढा राहिला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!