सोयाबीन दरात पुन्हा चढ-उतार ; पहा राज्यातील बाजारसमित्यांमधील बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी(29) राज्यातील सोयाबीन बाजारात समाधानकारक भाव होते. मात्र आजचा (30) बाजारभाव पाहता आज केवळ एकाच वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजरहून अधिक भाव मिळाला आहे आज आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 3 हजार 200 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान दर 5३०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर 7200प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर हा 6150 प्रतिक्विंटल राहिला. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दर 7100 प्रति क्विंटल इतका होता. हा दर आज 100 रुपयांनी वाढलेला दिसतो आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 7180 इतका भाव मिळाला होता. मात्र आज हा भाव घसरल्याचे दिसून येत आहे मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव हा केवळ 6980 प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. तर चांगला दर मिळतो अशी ख्याती असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जास्तीत जास्त 6405 इतका दर सोयाबीनला मिळाला आहे. आजचे संपूर्ण बाजार भाव पाहता आज केवळ हातावर मोजण्याइतपत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सहा हजार 500 पेक्षा अधिक दर मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घट झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये हा चिंतेचा विषय बनला आहे.

अद्यापही काही शेतकरी सोयाबीनला 8 हजार दर मिळेल अशी आशा ठेऊन आहे. शेतकऱ्यांनी संयम दाखवत टप्प्याने सोयाबीन बाजारात आणला. असेच धोरण पुढे देखील शेतकऱ्यांनी ठेवावे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. दुसरीकडे यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आता काही क्षेत्रावरील सोयाबीन हे फुलोऱ्यात आहे. त्यामुळे ते बाजारपेठेत येण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन विकणे गरजेचे आहे.

आजचा 30/12/2021 सोयाबीन बाजारभाव

शेतमाल– जात/प्रत– परिमाण- -आवक– कमीत कमी दर– जास्तीत जास्त दर– सर्वसाधारण दर

लासलगाव – विंचूर — क्विंटल 618 3000 6334 6300
बार्शी — क्विंटल 702 4500 6250 5750
माजलगाव — क्विंटल 147 5300 6224 5968
चंद्रपूर — क्विंटल 182 5880 6395 6200
सिल्लोड — क्विंटल 41 5800 6300 6000
उदगीर — क्विंटल 3900 6300 6390 6345
कारंजा — क्विंटल 6000 5710 6400 6050
लोहा — क्विंटल 59 6000 6361 6271
तुळजापूर — क्विंटल 235 6300 6300 6300
मोर्शी — क्विंटल 300 5500 6235 5867
राहता — क्विंटल 51 6186 6300 6271
गंगापूर हायब्रीड क्विंटल 4 5705 5810 5720
सोलापूर लोकल क्विंटल 68 6200 6300 6260
अमळनेर लोकल क्विंटल 100 5100 5500 5500
हिंगोली लोकल क्विंटल 400 6005 6605 6305
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 17 5501 6000 5900
मेहकर लोकल क्विंटल 930 5500 6400 5850
मेहकर नं. १ क्विंटल 130 6000 6980 6400
ताडकळस नं. १ क्विंटल 70 6200 6200 6200
जालना पिवळा क्विंटल 2330 5000 6300 6100
अकोला पिवळा क्विंटल 1014 5430 6405 5950
यवतमाळ पिवळा क्विंटल 459 3950 6450 5200
चोपडा पिवळा क्विंटल 23 5600 6200 5700
चिखली पिवळा क्विंटल 1060 5700 6624 6200
हिंगणघाट पिवळा क्विंटल 3041 5800 6525 6120
वाशीम पिवळा क्विंटल 3200 5300 7200 6150
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 5850 6250 6000
पैठण पिवळा क्विंटल 4 5875 6091 6000
धामणगाव -रेल्वे पिवळा क्विंटल 1335 5800 6795 6350
वर्धा पिवळा क्विंटल 37 5700 6095 5900
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 650 5850 6350 6195
गेवराई पिवळा क्विंटल 102 5600 6050 5800
परतूर पिवळा क्विंटल 111 5950 6300 6250
गंगाखेड पिवळा क्विंटल 10 6000 6300 6100
तेल्हारा पिवळा क्विंटल 250 5750 6100 5925
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 10 5500 6249 6100
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 250 6000 6350 6200
सेनगाव पिवळा क्विंटल 160 6000 6250 6050
पाथरी पिवळा क्विंटल 20 3162 6000 5851
पांढरकवडा पिवळा क्विंटल 113 6100 6300 6230
उमरखेड पिवळा क्विंटल 180 5500 5800 5700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 250 5600 5800 5700
राजूरा पिवळा क्विंटल 27 5900 6365 6195
काटोल पिवळा क्विंटल 54 3500 6120 5350
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 135 3500 5800 5000
देवणी पिवळा क्विंटल 46 6151 6540 6345

Leave a Comment

error: Content is protected !!