शेतकऱ्यांमध्ये धाक धुक …! सोयाबीनच्या भावात चढ -उतार, पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या आठवड्याचे राज्यातल्या बाजार समितीतले सोयाबीनचे बाजारभाव पाहता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यापूर्वी हातावर मोजता येण्या इतपत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ७००० चा भाव होता. मात्र मागच्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दराला उतरती कळा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांशी बाजार समित्यांचे दर हे ६००० वर स्थिर आहेत. रविवारी २६-१२-२१ राज्यातलया तीन बाजार समित्यांमधील बाजारभाव उपलब्ध झाले आहेत.

दिनांक २६-१२ -२०२१ च्या बाजारभावानुसार सिल्लोड येथे एकूण 45 क्विंटल सोयाबीन आवक झाली. त्यामुळे सोयाबीनला तिथे कमीत कमी दर 5900जास्तीत जास्त दर 6300 तर सर्वसाधारण दर हा 6000 इतका मिळाला. शिरूर बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली. यामध्ये कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, आणि सर्वसाधारण दरही 6000इतका राहिला. याशिवाय अंजनगाव सुरजी येथे 50 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यासाठी कमीत कमी दर 5500 जास्तीत जास्त दर 6570 सर्वसाधारण दर हा 6000 इतका मिळाला आहे. याचाच अर्थ काल राज्यात सर्वाधिक दर हा 6500 इतका राहिला आहे तर कमीत कमी दर हा 5500 इतका राहिला आहे. तर सर्वसाधारण दर हा सहा हजार इतका राहिला.

सोयाबीन दरात चढ -उतार
दरम्यान सोयाबीन बाजारपेठेमध्ये सोयाबीनच्या दरात सतत चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. मात्र शेतकरी अजूनही सोयाबीनचा चांगला दर मिळतील या विश्वासावर ठाम आहेत. सोयाबीन स्टॉक मध्यंतरी सोयाबीन आयातीची चर्चा आणि आता वायदे बंदी असे निर्णय घेऊन सर्व काही स्थिर असल्याचे दाखवून दिले जात आहे . मात्र शेतकऱ्यांनी सध्या टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी सोयाबीन बाजारात नेण्याची आवश्यकता असल्याचं तज्ञांनी सांगितला आहे.

शेतमाल— जात/प्रत— परिमाण– आवक— कमीत कमी दर —जास्तीत जास्त दर— सर्वसाधारण दर
26/12/2021

सिल्लोड — क्विंटल— 45— 5900, 6300, 6000
शिरुर — क्विंटल 1— 6000, 6000, 6000
अजनगाव सुर्जी —पिवळा— क्विंटल— 50— 5500, 6500, 6000

Leave a Comment

error: Content is protected !!