सोयाबीनला गतवर्षीच्या तुलनेत जादा भाव तरीही शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल, उडीद दर पुन्हा वधारला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला ११ हजारांचा विक्रमी दर मिळाला होता. अद्यापही सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने सोयाबीनच्या साठवणुकीवर शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लातूरच्या बाजारात अद्यापही म्हणावी तशी आवक वाढताना दिसत नाही. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दरात सुधारणा झाली खरी मात्र तरीही बाजारपेठेत मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. यावेळची गतवर्षाची तुलना केल्यास सध्या दारात १००० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र सोयाबीन विक्रीची शेतकऱ्यांची मानसिकता दिसत नाही.

सोयाबीन हे खरिपातील नगदी पिक आहे. शिवाय मराठवाड्यातच नव्हे तर सबंध राज्यात सोयाबीनचे क्षेत्र हे वाढलेले आहे. उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन बाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत. त्यामुळेच गतवर्षी सोयाबीनला सरासरी 4500 चा दर होता तरी लातूरच्या बाजार समितीमध्ये 40 ते 50 हजार क्विंटलची आवक होती. आता सोयाबीनला 5200 चा सरासरी दर आहे. मात्र, आवक ही 12 ते 14 हजार क्विंटलची होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत 1000 रुपयांनी वाढ झालेली असतानाही सोयाबीन विक्रीची शेतकऱ्यांची मानसिकता नाही.

योग्य पद्धतीनेच साठवणूक करा

–यंदा सोयाबीन काढणीनंतरही आणि मळणीनंतरही पावसात भिजलेले आहे.
–त्यामुळे त्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे.
–असे असतनाही शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवरच भर दिलेला आहे.
–मात्र, साठवणूक केलेल्या सोयाबीनला वाळवणेही गरजेचे आहे.
— एकाच ठिकाणी अधिकचा काळ सोयाबीन थप्पी लावून ठेवले तर बुरशी लागण्याचा धोकी आहे.
–सोयाबीन ओले असतानाच काढणी आणि कापणी ही झालेली आहे.
–त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण हे वाढलेले आहे.
–त्याचे प्रमाण हे 10 ते 12 पर्यंत येणे आवश्यक आहे. शिवाय हे प्रमाण मोजण्याचे यंत्रही बाजार पेठेत आहे.

उदिडला चांगला भाव

–बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाचे दर हे घटले होते.
–हंगामात क्वचितच उडदाचे दर हे घसरलेले आहेत.
–बुधवारी उडदाला 7 हजाराचा दर मिळाला होता.
–आतापर्यंत किमान 7200 दर उडदाला राहिलेला आहे.
–मात्र, बुधवारी यामध्ये घसरण झाली होती.
— गुरुवारी पुन्हा उडदाच्या दरात वाढ झाली आहे.
–गुरुवारी उडदाला 7300 चा दर मिळाला आहे.
–त्यामुळे उडदानेच शेतकऱ्यांना यंदा तारलेले आहे.
–मात्र, आता उडीद शिल्लक नाही तर शेतकरी हे सोयाबीनच्या साठवणूकीवर लक्ष केंद्रीत करीत आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6000 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 50000, चना मिल 4900, सोयाबीन 5411, चमकी मूग 7200, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7300एवढा राहिला होता.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!