सोयाबीनचे दर पुर्वपदावर; पहा आजचा बाजारभाव …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवार पासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शुक्रवारी 6 हजार 400 वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तर समाधान आहेच पण आता सोयापेंडची आयात होणार का नाही यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

सोयाबीनच्या दरात कमी-अधिक प्रमाणात बदल होत असतानाही शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन साठवणूकीवरच होता. कारण मध्यंतरी 6 हजार 600 रुपये दर असतानाही लातूरच्या बाजार समितीमध्ये केवळ 8 ते 10 हजार पोत्यांचीच आवक होती. आता तर पुन्हा सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकरी साठवणूकीवर भर देणार का हे पहावे लागणार आहे. कारण शेतकऱ्यांना 7 हजारापेक्षाच अधिकच्या दराची अपेक्षा आहे. मात्र, बाजारातील अस्थिरता पाहता शेतकऱ्यांनी अधिकचा काळ सोयाबीनची साठवणूक न करता विक्री करणे महत्वाचे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6300 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5850 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4800, सोयाबीन 7073, चमकी मूग 7200, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7015 एवढा राहिला होता.

आजचे ३-१२-२१, सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल ( किमान -कमाल – सर्वसाधारण )

जळगाव —5800-6000-6000
माजलगाव —5300-6320-5900
राहूरी -वांबोरी—6150- 6255-6202
सिल्लोड —4700-6100-5800
उदगीर —6550-6655-6602
कारंजा —5850-6620-6150
परळी-वैजनाथ —5830-6576-6251
राहता —6200-6646-6450
सोलापूर—-3600-6515-6355
अमरावती—5800-6271-6035
अमळनेर—6200-6200-6200
हिंगोली—5999-6660-6329
अंबड (वडी गोद्री)—5675-6351-6071
मेहकर—5400-6700–6200
लातूर—6000–7073–6500
लातूर -मुरुड—6100– 6500–6400
जालना—5350–6450–6250
अकोला—5000–6980–6000
यवतमाळ—3950–6510–5230
चिखली—5800–6900–6350
बीड—5000–6500–6313
पैठण —5822–5981–5900
वर्धा—6250–6500–6350
भोकर—4809–6300–5555
जिंतूर—6100–6700–6300
मलकापूर—5825–6145–6070
सावनेर—5676–5895–5800
जामखेड—5500–5900–5700
गेवराई—5700– 6400–6200
देउळगाव राजा—5950–6500–6300
गंगापूर—4800– 6100–5800
मंठा—5000–6350–6000
उमरगा—5900–6400–6351
पांढरकवडा—5800–6300–6150
उमरखेड– 5100–5300–5200
काटोल—3500–6311–5680
आष्टी- कारंजा—4000–6375–5200
सिंदी(सेलू) —6250–6700–6525

Leave a Comment

error: Content is protected !!