15 तारखेपासून परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन विक्री नोंदणी, ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 5 ऑक्टोबर रोजी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर 25 लाख टनांपेक्षा अधिक कडधान्य आणि तेलबिया खरेदीसाठी परवानगी दिली आहे. केंद्र सरकार कडून मुगासाठी 33 हजार टन तर उडीद साठी 38 हजार टन खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आली आहे. याची अंलबजावणी करायला राज्यात सुरुवात झाली आहे.

राज्यातील परभणी हिंगोली जिल्ह्यातील 15 केंद्रांवर केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड तर्फे मूग प्रतिक्विंटल 7 हजार 275 रुपये प्रति क्विंटल उडीद 6300रुपये खरेदीसाठी मंगळवार दिनांक 5 पासून नोंदणी सुरू करण्यात आली. सोयाबीन प्रतिक्विंटल 3950 रुपये खरेदीसाठी शुक्रवारी तारीख 15 पासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.  ही माहिती राज्य सहकारी पणन महासंघाचे जिल्हा विपणन अधिकारी के.जे. शेवाळे यांनी दिली आहे. संबंधित तालुक्यातील किंवा तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनीही नोंदणी करावी असे आवाहन शेवाळे यांनी केला आहे.

पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात ठिकाणी तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत व गंगाखेड या केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू होणार आहे. या केंद्रांच्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शेतकरी नोंदणी सुरू करण्यासाठी संबंधित संस्थांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान मानवत येथे यंदा राज्य सहकारी पणन महासंघातर्फे खरेदी केली जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे. परंतु तूर्त मानवत सेना विदर्भ सहकारी पणन संघाच्या यादीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

— तलाठ्याच्या सही शिक्क्याचा ऑनलाईन सातबारा
— आधार कार्ड
–बँक पासबुक झेरॉक्स बँक पासबुक वर शेतकऱ्यांचे नाव खाते क्रमांक आय एस एस सी कोड स्पष्ट असावा
— जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये

Leave a Comment

error: Content is protected !!