सोयाबीनची आवाक कमी दर आहेत स्थिर ; जाणून घ्या कोणत्या बाजारात किती दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असताना दिसत असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत आशादायक गोष्ट आहे. पोल्ट्री ब्रीडर्सने घेतलेल्या भूमिकेमुळे सोयाबीनच्या दरावर काही परिणाम होईल का ? अशी चिंता शेतकऱ्यांना होती मात्र केंद्र सरकारने अद्याप असोसिएशनच्या मागणीबद्दल निर्णय दिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही साधायचे सोयाबीनचे दर पाहता हे दर स्थिर आहेत.

वाढते दर अखेर 5900 वर स्थिरावले

दिवाळीनंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये कायम वाढ राहिलेली होती. दिवसाकाठी 150 रुपयांनी वाढ होत होती. मात्र, शनिवारी 5900 वरच दर स्थिरावले होते. दराची चिंता न करता शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला असल्याचे शनिवारी झालेल्या आवकवरुन समोर आले आहे. शनिवारी केवळ 14 हजार पोत्यांचीच आवक झाली होती. त्यामुळे दर वाढली की आवक वाढणार या सुत्राला शेतकऱ्यांनी छेद दिला आहे. त्यामुळे मनातला दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री नाही असाच निर्धार शेतकऱ्यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीनला 7 हजाराचा दर मिळण्याचा अंदाज

पोल्ट्री ब्रीडर्स यांनी सोयापेंडच्या आयातीची मागणी केली असली तरी त्याचा परिणाम सोयाबीनच्या बाजार भावावर झालेला नाही. सध्या प्रक्रिया उद्योजक हे सोयाबीन खरेदीला पसंती देत आहेत. शिवाय मागणीपेक्षा पुरवठा हा कमीच आहे. त्यामुळे सोयबीनला भविष्यात 6 हजार 500 ते 7 हजाराचा दर मिळेल असा अंदाज व्यापारी अशोक आग्रवाल यांनी एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यामुळेच शेतकरी अजूनही सोयाबीन विक्रीची गडबड करीत नाही. शिवाय 7 हजाराचा दर होत असलेल्या आवकवरुन अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी केवळ योग्यारित्या सोयाबीनची साठवणूक करणे गरजेचे आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6000 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5900 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5700 रुपये क्विंटल, जानकी चना 5100 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 6350, चमकी मूग 7300, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7250 एवढा राहिला होता.

राज्यतील महत्वाच्या बाजारातील सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल (२०-11-21)

अहमदनगर 5875, अकोला 5613, औरंगाबाद 5655, बीड 5700, बीड 5800, बुलढाणा लोकल 5900, बुलढाणा पिवळा 5358 ,चंद्रपूर 4450, हिंगोली 6105, जळगाव ६२०० ,जालना ६०१७, लातूर 5791, लातूर 5900, नागपूर 5700, नांदेड 5200 नंदुरबार 5846 नाशिक 5550

Leave a Comment

error: Content is protected !!