सोयाबीनची वाटचाल पुन्हा चढ्या दराकडे, जाणून घ्या आज किती मिळाला बाजारभाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले बाजार भाव पाहता सोयाबीनचे कमाल भाव ७ हजार रुपयांच्यावर स्थिर आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा अशी आशा आहे. पाहुयात आज ८ राजुरातील कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला किती मिळाला भाव.

देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करणार नाही:पियुष गोयल
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोया डी ऑइल केकची आयात न करण्याबाबत कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी निवेदन दिले. पोल्ट्री उद्योगातील लोक सरकारकडे आयातीची परवानगी मागत आहेत. देशभरात 6 दशलक्ष टन सोया डी ऑइल केकची गरज असून, यावर्षी केवळ शेतकरी 86 लाख टन उत्पादन घेईल, असा अंदाज आहे.अशा परिस्थितीत सोया डी ऑइल केकच्या आयातीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सोया डी ऑइल केकची आयात केली जाईल, असा कोणताही प्रस्ताव भारत सरकारकडे नाही, असे आश्वासन वाणिज्यमंत्र्यांनी यावेळी दिल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले . नरेंद्र मोदी सरकार कोणत्याही किंमतीत देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करणार नाही, अशी ग्वाही वाणिज्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. जी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे.

आजचे(8-12-21) सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल (किमान -कमाल -सर्वसाधारण )
लासलगाव – विंचूर—3000 6712 6650
माजलगाव —5000 6571 6300
राहूरी -वांबोरी—5501 6400 5950
उदगीर—6600 6711 6655
कारंजा—6000 6490 6225
परळी-वैजनाथ— 6000 6700 6520
राहता—6271 6669 6475
वडवणी—6301 6501 6400
धुळे —5800 7076 6800
सोलापूर—4000 6600 6450
हिंगोली— 5950 6600 6275
कोपरगाव—4500 6585 6450
मेहकर—5500 7000 6500
लातूर—6301 7270 6870
जालना—4500 6600 6400
अकोला—4800 6640 6300
आर्वी— 5600 6600 6300
चिखली—5800 6780 6290
हिंगणघाट—5800 6500 6100
पैठण —6100 6581 6352
धामणगाव—5500 6430 6000
हिंगोली- खानेगाव —6000 6400 6200
जिंतूर—5225 6630 6300
सावनेर—5250 5250 5250
गेवराई—5900 6400 6150
परतूर—6400 6665 6650
गंगाखेड—6650 6850 6650
देउळगाव राजा—6000 6600 6200
तळोदा—6100 6562 6400
गंगापूर—5600 6160 5975
आंबेजोबाई—6300 6580 6400
मंठा—5000 6315 5800
किनवट—6400 6700 6550
मुखेड—6400 6700 6600
मुरुम—5600 6740 6170
पुर्णा—5200 6200 6100
मंगळूरपीर – शेलूबाजार—5200 6540 6400
चांदूर-रल्वे—6210 6700 6500
काटोल—4550 6211 5260
आष्टी (वर्धा)—3800 6450 5500
आष्टी- कारंजा—4000 6500 5500
पुलगाव—6135 6600 6370

Leave a Comment

error: Content is protected !!