सोयाबीन पिवळे पडतयं ? जाणून घ्या (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसाने वेळेवर मेहरबानी केल्याने राज्यात खरिप मध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली आहे. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या थांबलेल्याही आहेत . यादरम्यान उगवलेली सोयाबीन पिवळी पडल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे . यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून सोयाबीन पिवळे पडल्यावर करावयाचे उपाय योजना यासंदर्भात देण्यात आलेला हंगामीपिक सल्ला शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरणार आहे. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे.

लक्षणे:
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

कारणे:
लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.

व्यवस्थापन:

शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड (II) २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी ०२४५२-२२९०००

Leave a Comment

error: Content is protected !!