सोयाबीनला पावसाचा तडाखा, दरावरही होणार परिणाम ; शेतकऱ्यांची चिंता कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. मागील चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले असून त्याचा परिणाम सोयाबीनच्या दारावरही होणार असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे सोयाबीनची आवक लांबणीवर पडणार आहे तर पावसामुळे काळवंडलेले सोयाबीन दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोयाबीनचा दर्जा घसरणार ?

गतवर्षी खरिप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे केवळ 5 हजार रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. यंदा सर्वकाही सुरळीत असल्याने सोयाबीनला अधिकचा दर मिळेल असा आशावाद होता. मात्र, गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता सोयाबीनची आवक सुरु झाली तरी त्याप्रमाणात मोबलता मिळणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी असून 9 हजार प्रति क्विंटल दर आहे. यंदा 15 दिवस उशिराने सोयाबीन बाजारत दाखल होणार आहे. चार दिवस झालेल्या पावसामुळे सोयाबीन हे काळवंडले असून त्याचा दर्जाही खलावलेला राहणार आहे. त्यामुळे 9 हजारावरील सोयाबीन 6 हजारवर येणार असल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.

सोयाबीनच्या दारावर परिणाम

मराठवाड्यात सोयाबीनसाठी लातुर ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी चार हजार क्विंटलची आवक आहे. यामध्ये नविन सोयाबीन हे 300 कट्टे असून त्याचा दर्जाही खलावलेला आहे. त्यामुळे आवक वाढली की आता सोयाबीन हे 6 हजारवरच येणार असल्याचे चित्र आहे. गतवर्षीही सोयाबीन हे जोमात होते. ऐन काढणीच्या प्रसंगी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन कवडीमोल दराने विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. 15 दिवसांपुर्वी सोयाबीनचे दर हे 10 हजारांवर गेले होते. बदलत्या वातावरणानुसार दरामध्ये बदल होत आहे.

उत्पादन वाढीसाठी शेतकरी नवनविन प्रयोग राबवित आहे. परंतु, निसर्गाच्या लहरीपणाचा कायम फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी 10 हजार रुपयांपर्यंत भाव गेला होता. गतआठवड्यापासून पुन्हा दरात घट होऊ लागली आहे. केंद्र सरकारने आगामी काळात सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सोयाबीनलच्या काढणी प्रसंगीच सोयापेंडची आवक होत असल्याने याचा परिणाम दरावर होणार हे नक्की.

Leave a Comment

error: Content is protected !!