सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल ; पहा कुठे किती भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरंच ज्याची अपेक्षा होती आता ते घडतंय असा म्हणायला काहीच हरकत नाही कारण मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चांगली वाढ होताना दिसत आहे आणि आता पाऊसही उघडला आहे. मागील आलेख बघता सोयाबीनच्या दरात रोज 100 ते 150 रुपयांनी वाढ होत आहे. बुधवारी अलोका कृषी उत्पन्न बाजार समितीत 3720 क्विंटल सोयाबीनची आवक झाली . यावेळी सोयाबीनला तब्बल 8300 कमाल दर तर 6000 किमान दर आणि 7150 सर्वसाधारण दर मिळाला. त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र आज याच अकोला बाजारपेठेत किमान दर 6000, कमाल दर 6750, तर सर्वसाधारण दर 6400 इतका मिळाला आहे. सोयाबीनचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

अकोला बाजारसमितीत चांगला दर

आकोल्याच्याच बाजारसमितीने तब्बल 11 हजार 300 रुपये हा मुहूर्ताच्या सोयाबीनला दर जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर दरात कमालीची घट झाली होती. बुधवारी याच बाजार समितीमध्ये गणेश सांकूदकर या बाभूळगाव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8 हजार 300 रुपये प्रति क्विंटला दर मिळालेला आहे. या शेतकऱ्याने 12 पोते सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. सोयाबीन हे चांगल्या प्रतिचे असल्याने हा दर मिळाला आहे. सरासरी दर हा 6 हजार 400 रुपयेच चालू आहे. मात्र, अशीच आवक होत राहिली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे.

लातुरात दर स्थिर

दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. सध्या सोयाबीनच्या दराभोवतीची बाजारपेठेची उलाढाल आहे. यातच गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दराच कायम वाढ होत आहे. दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ होत असताना लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर हे 6 हजार 450 वर स्थिरावलेले आहेत.

आज बाजारसमित्यांमधील बाजारभाव प्रतिक्विंटल (किमान – कमाल -सर्वसाधारण )

नागपूर 4900- 7000- 6475
नांदेड 5844- 6350- 6097
नंदुरबार 6672- 6815- 6700
परभणी 5500- 6551- 6000
परभणी 5888- 6597- 6375
वाशिम 5800- 6640- 6150
यवतमाळ 5100- 5300- 5200
अमरावती 5500- 6525- 6012
औरंगाबाद 4500- 4500- 4500
बीड 6391- 6648- 6500
बुलढाणा 5500-6700- 6100
हिंगोली 6050- 6625- 6337
जालना 5950- 6280- 6000
लातूर 6101- 6966- 6728
नागपूर 4900- 7000- 6475
नांदेड 5844- 6350- 6097
अकोला 6000- 6750- 6400

 

Leave a Comment

error: Content is protected !!