अवघ्या 10 हजार रुपयांत घरीच सुरू करा हा व्यवसाय; दरमहा होईल कमाई 30 हजार रुपयांची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रोजच्या जेवणाला आणखी चवदार बनवणारं लोणचं तुम्हाला चांगले पैसे देखील कमवून देऊ शकते. कैरीवर प्रक्रिया करून लोणचं बनवण्याचा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता. घरी बसून हा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता. महिलांना यात उत्तम संधी आहे . काही ठिकाणी महिलांचे बचतगट हा व्यवसाय यशस्वीपणे राबवत आहेत.

अवघ्या दहा हजारांची करा गुंतवणूक

लोणचं बनवण्याचा व्यवसाय तुम्ही अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. तसेच, तुमच्या लोणच्याची मागणी, पॅकिंग आणि तुमच्या परिसरानुसार यातून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमाई केली जाऊ शकते. तुम्ही हे लोणचं ऑनलाईन, रिटेल मार्केट आणि रिटेल चेन अशा विविध पर्यायांमार्फत विकू शकता. लोणचं बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला दहा हजार रुपये खर्च येतो. तसेच, पहिल्याच वेळी तयार करण्यात आलेल्या लोणच्यामधून तुम्ही जवळपास 20 हजार रुपये कमवू शकता. म्हणजेच, पहिल्याच कामात तुमची गुंतवणूक पूर्णपणे वसूल होते. यानंतर निव्वळ नफा मिळण्यास सुरुवात होते.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी (FSSAI)

–लोणच्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 900 वर्गफूट जागेची गरज आहे.
–लोणचं तयार करणे, वाळवणे तसेच त्याचे पॅकिंग या सगळ्यासाठी मोठ्या आणि मोकळ्या जागेची गरज असते.
–लोणच्याचा व्यापार करण्यासाठी तुम्हाला परवान्याची गरज असते.
–फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी (FSSAI) मार्फत लायसन्स मिळवल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!