राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ,तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश : कृषीमंत्री भुसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात मराठवाडा विदर्भासह राज्यातल्या अनेक भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी तात्काळ पंचनामे करणार यावेत. एकही नुकसान ग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. नाशिक येथे आयोजित बैठकीदरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान भरून येणारं नाही मदत निश्चित दिली जाईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे. याचा मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसलाय. राज्य सरकारने या प्रकरणी लक्ष घातले आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार मदत करणार असल्याचं मंत्री भुसे यांनी बोलताना सांगितले.आता पाऊस थांबला नंतर पुढील आठ दिवसात पंचनामे पूर्ण होतील. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीचे धोरण ठरवले जाईल असा व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

Leave a Comment

error: Content is protected !!