सातबारा उताऱ्यावरील पोटखराबा नोंदी हटवण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सातबारा उताऱ्यावर पोटखराबाचा उल्लेख असतो . आता हा उल्लेखाचा हटवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. सुरुवातीला जळगावात हा उपक्रम केला जाणार आहे. यासंबंधीच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

आता तुम्ही म्हणाल पोटखराबा म्हणजे काय ? शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रातून ओढे ,नाले यांची उभारणी केली जाते. ही कामे खरेतर शासनाच्या माध्यमातून होत असतात मात्र प्रत्यक्षात ही जमिन वहिवाटाखाली आणणे शक्य नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनी असूनही त्याचा वापर हा करता येत नव्हता. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर झाली तर क्षेत्रही वाढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.

कशी आहे प्रक्रिया ?
–महसूल विभागाअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
–सुरवातीला तलाठी पाहणी करणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना 16 प्रकराचे अर्ज तलाठ्यांकडे जमा करावे लगणार आहेत.
— पोटखराबा जमिन वहिवाटाखाली आणण्यासाठी तलाठी गावातील गट क्रमांक निहाय जमिनीची माहिती संकलित करावी लागणार आहे.
— यानंतर जबाब,पंचनामा आणि हस्तकेच नकाशा तयार करावा लागणार आहे. हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे.
— मंडळ अधिकारी देखील या अहवालातील 10 टक्के गट शिवारातील पाहणी करतील आणि आपल्या अभिप्राय हा तहसीलदार यांना देतील.
— तहसीलदार हे गावनिहाय माहिती ही उपअधीक्षक भूमीअभिलेख यांच्याकडे अभिप्रायसाठी पाठविणार आहेत.
–यानंतर भूमी अभिलेखचे उपअधीक्षक हेच पोटखराबा जमिन वहिवाटाखाली येणार का नाही यासंबंधी अहवाल तहसीलदार यांना देणार आहेत.
— या प्रक्रियेत तहसीलदार यांचीही भूमिकाही महत्वाची आहे.
— अंतिम टप्प्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडून अहवाल हा तहसीलदार, तलाठी यांच्याकडे आल्यानंतर यावर पोटखराबा क्षेत्र हे वहिवाटाखाली आल्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर केली जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!