राज्यातील तापमानात वाढ, अकोला @ 42.3 अंश सेल्सिअस ; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ढगाळ हवामान निवळले असून राज्यात आता उष्णते मध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमान हे चाळिशीपर्यंत पोहोचलेले आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चार दिवसात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आला आहे.

या राज्यात उषातेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये गुजरात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या तीन-चार दिवसांमध्ये मध्यप्रदेश, विदर्भ आणि राजस्थानात उष्णतेची लाट येईल तर दिनांक 29 ते 31 मार्च च्या दरम्यान दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

या भागाला उष्णतेचा यलो अलर्ट
मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता ते वातावरण निवळले आहे. आता उष्णतेमध्ये वाढ होत आहे. येथून पुढचे काही दिवस कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज दिनांक 28 रोजी अकोला आणि बुलढाणा या दोन भागासाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या दिनांक 29 मार्च रोजी जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली ,वाशिम ,अकोला ,अमरावती, आणि यवतमाळ या भागाला उष्णतेसाठी यलो अलर्ट देण्यात आलाय. तर दिनांक 30 मार्च रोजी जळगाव ,अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली ,वाशिम ,अकोला ,अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील कमाल तापमान
दरम्यान दिनांक 27 मार्च रोजी राज्यातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे नोंदवले आहे. पुणे 38.6, लोहगाव 38.9, कोल्हापूर 37 अंश सेल्सिअस ,महाबळेश्वर 32 . ६, नाशिक 38.8, सांगली 36.4, सातारा 38.6 आणि सोलापूर 40.2 अंश सेल्सिअस, मुंबई 32.5 सांताक्रुज 36.7, रत्नागिरी 32. ६, पणजी 32.4, डहाणू 32.5, औरंगाबाद 39.6, परभणी 41.2, अकोला 42.3, अमरावती 41. ४, बुलढाणा 39.8, ब्रह्मपुरी ४०.७ ,गोंदिया 40.0, नागपूर 40.2, वाशीम 41, वर्धा 40.0.

Leave a Comment

error: Content is protected !!