राज्याच्या तापमानात चढ -उतार सुरूच ; वायव्य भारतात थंडी वाढली तापमान उणे 4.5 अंशांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवसात राज्यात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर आज दिनांक दहा रोजी कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

वायव्य भारतात थंडी वाढू लागली असून राजस्थानच्या चुरू येथे गुरुवारी दिनांक 9 रोजी देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात विविध भागात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा वाढला असून सांताक्रुज अलिबाग, रत्नागिरी येथे तापमान 33 अंशांच्या पुढे गेले. गुरुवारी दिनांक नऊ सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी 34 पॉइंट नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. महाबळेश्वर येथे 14.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज पुण्यात कमीत कमी 15.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
दरम्यान आज पुणे इथं पहाटे बारामती येथे 15.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील चिंचवड येथे 18.8 ,जुन्नर 16.7, आंबेगाव 16.4, मगरपट्टा 18.9, माळीन 14.2, शिवाजीनगर 14.9, तळेगाव 15.1, दौंड 17.3, गिरीवन 17.1, इंदापूर 16.8, दुदुळगाव 16.1, ढमढेरे 16.9, खेड 17.9, वडगाव शेरी 20.2, पुरंदर 17.9, राजगुरुनगर 16.1, हवेली 14.2, नेमगिरी 15.3 आणि शिरूर 14.4 अशा किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!