हरभऱ्याच्या चांगल्या दरासाठी अद्याप प्रतीक्षाच ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हरभऱ्याचे उत्पादन चांगलं झालं असलं तरी शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अद्यापही अपेक्षा आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये म्हणावेत असे दर शेतकऱ्यांना मिळत नाहीयेत देशी हरभऱ्याचे सर्वसाधारण दर हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत.

दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं लोकल हरभऱ्याला सात हजार 500 रुपयांचा कमाल भाव मिळाला. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याची 15 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव चार हजार तीनशे, कमाल भाव सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण भाव चार हजार 700 रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव पाच हजार एकशे पंचवीस रुपये इतका मिळाला आहे. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव 5700 रुपये इतका मिळाला आहे. शिवाय पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल हरभरा ला सहा हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला आहे. तर दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ हजार 400 रुपयांचा कमाल भाव हरभऱ्याला मिळाला आहे. मात्र हा हरभरा काबुली असण्याची शक्यता आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-4-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/04/2022
दोंडाईचाक्विंटल444400084006400
माजलगावक्विंटल206390042064100
राहूरी -वांबोरीक्विंटल13449048004650
पैठणक्विंटल7410044204350
उदगीरक्विंटल1225445045614505
भोकरक्विंटल13260043253462
मोर्शीक्विंटल702420044004300
आष्टी (वर्धा)क्विंटल100400044454200
राहताक्विंटल7438644254400
चिखलीचाफाक्विंटल645420143814291
मलकापूरचाफाक्विंटल278405544904220
सोलापूरगरडाक्विंटल76420044704400
उमरगागरडाक्विंटल9439044014400
पुर्णागरडाक्विंटल24430043004300
जालनाकाबुलीक्विंटल5560056005600
अकोलाकाबुलीक्विंटल11370037003700
पवनीलालक्विंटल2610061006100
बीडलालक्विंटल11420043114272
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल3450045004500
दौंडलालक्विंटल5421143514351
चाकूरलालक्विंटल30437144524422
औराद शहाजानीलालक्विंटल74438344714427
मुरुमलालक्विंटल40420045004350
उमरखेडलालक्विंटल190440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल130440045004450
लाखंदूरलालक्विंटल66440044504425
जालनालोकलक्विंटल1096390044304380
अकोलालोकलक्विंटल1917410046204400
अमरावतीलोकलक्विंटल3365440045004450
नागपूरलोकलक्विंटल2388415045034415
मुंबईलोकलक्विंटल522520057005500
मुर्तीजापूरलोकलक्विंटल2060415044504350
सटाणालोकलक्विंटल19365045604454
गेवराईलोकलक्विंटल80420044504300
परतूरलोकलक्विंटल34439044604420
देउळगाव राजालोकलक्विंटल25420043264300
नांदगावलोकलक्विंटल15430075004700
बसमतलोकलक्विंटल41429044004340
देवळालोकलक्विंटल2500051255125
दुधणीलोकलक्विंटल137438546504500
ताडकळसनं. १क्विंटल21430043004300

Leave a Comment

error: Content is protected !!