यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परवाना नसतानाही खतांचा अनधिकृतपणे साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाने एक कृषी सेवा केंद्र सील करण्याची कारवाई केली आहे. अडीच लाख रुपयांचा अनधिकृत इंग्लिश खतांचा साठा देखील या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

खरिपाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात अनधिकृत बियाणे व खत माफिया जिल्ह्यात सक्रिय झाले असतानाच पोलीस व कृषी विभागाने देखील त्यांच्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. कृषी विभागाला पुसद तालुक्यातील सिंगारवाडी इथं अनधिकृत खतांचा साठा सापडला असल्याची माहितीच्या आधारे कृषी विभागानं सेवादास कृषी केंद्रावर छापा मारी केली आहे.

यावेळी कृषी सेवा केंद्रातून किसान गोल्ड कंपनीचा मिश्र खतांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना त्या खतांची नोंद नाही. त्यानंतर देखील खताचा साठा करण्यात आल्याने कृषी विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत किसान गोल्ड कंपनीचे लेबल असलेले 20:20:00खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राजेंद्र माळोदे, पंकज बर्डे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दत्तात्रय आवारे उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक यांच्या पथकाने केली आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!