‘या’ कारणामुळे हरभरा खरेदी बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचा विचार करता रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. शिवाय उत्पादनही चांगले मिळाले. मात्र म्हणावा तसा दर अद्यापही हरभऱ्याला खुल्या बाजारात मिळत नाहीये. हे दर प्रति क्विंटल ५००० रुपयांच्या आताच आहेत. मात्र नाफेडच्या केंद्रावर ५२३० रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आल्यामुळे नाफेडवर शेतकऱ्यांनी मला विक्रीला प्राधान्य दिले आहे. पण महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोडाऊन भरल्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे हरभरा खरेदी केंद्र बंद पडली आहेत. कंपन्यांच्या गोडाऊनमध्ये जागा शिल्लक शेतकरी हरभरा विक्रीसाठी केंद्रावर खेटे मारत आहेत. नाफेडने गोडाऊनची व्यवस्था करून खरेदी व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपनी संघाकडून करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात नाफेड व एफसीआयकडून शासकीय किमान हमी दरानुसार हरभरा खरेदी सुरु आहे. यात महाएफपीसीकडून जिल्ह्यात ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीकडून शेतकऱ्यांचा हरभरा गावस्तरावर खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.

आजपर्यंत शेतकरी उत्पादक कंपनीकडून चार लाख क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. हा खरेदी केलेला हरभरा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी नांदेड, एमआयडीसी कृष्णुर, देगलूर, धर्माबाद आदी गोडाऊनवर साठविण्यात येत आला. परंतु वखार महामंडळाचे गोडाऊन भरल्यामुळे खरेदी प्रक्रिया बंद झाली आहे. उत्पादक कंपन्यांच्या गोडाऊनमध्येही खरेदी केलेला हरभरा साठविल्यामुळे जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी विक्री अभावी शिल्लक राहिलेले शेतकरी खरेदीसाठी आग्रह धरत आहेत. दरम्यान गोडाऊन उपलब्धते संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनीही वखार महामंडळाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे सांगितले आहे. नांदेड एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या स्वतः:च्या तसेच भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये आजपर्यंत १९ हजार क्विंटल हरभरा साठविण्यात आला आहे. या ठिकाणी गोडाऊन शिल्लक नसल्याने माल साठविण्याची क्षमता नाही. खरेदी संस्थानी एमआयडीसीकडे गाड्या पाठवू नये. वखार महामंडळाने इतर ठिकाणी गोडावूनची व्यवस्था करावी, अशी माहिती एमआयडीसी वखार महामंडळाचे साठा अधीक्षक संजय शिंदे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!