अजबच …! मानवी मुलासारखे दिसणारे हे शेळीचे पिल्लू पाहिले का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक चित्र विचित्र घटना घडत असतात. यापूर्वी तुम्ही चार पायाची कोंबडी , दोन चेहरे असलेलं रेडकू. अल्बिनो प्राणी यांच्याबद्दल नक्कीच ऐकलं आणि पहिले असेल मात्र आसाममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका शेळीने चक्क मानवासारख्या दिसणाऱ्या पिल्ल्याला जन्म दिला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आसाममधल्या कछार जिल्ह्यातील गंगा नगर या गावामध्ये ही घटना घडली आहे. एका बकरीने चक्क मानवासारख्या दिसणाऱ्या पिलाला जन्म दिला. या पिलाला पाहताच सर्वजण आवाक झाले. विशेष म्हणजे या पिलाचे दोन पाय आणि कान वगळता संपूर्ण शरीर हे एखाद्या माणसाच्या मुलासारखेच होते. विशेष म्हणजे या पिलाला शेपूटही नव्हती.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मानवासारख्या दिसणाऱ्या शेळीच्या पिलाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. जेव्हा गावात याबाबतची बातमी समजली तेव्हा या शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी अक्षरश: लोकांची झुंबड उडाली होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की जन्मानंतर केवळ अर्ध्या तासात या शेळीच्या पिलाचा मृत्यू झाला. या पिलाचा फोटो मात्र सर्वत्र व्हायरल होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!