27 लाख शेतकऱ्यांचे अडकले पैसे; पीएम किसान योजनेत करू नका ‘या’ चुका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान योजनेचा नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स नी दिली आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. हे सहा हजार रुपये 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. अर्ज भरताना जर आपली माहिती नोंदवताना एखादी चूक झाली तर पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.

काही दिवसांपुर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता सरकारने शेतकऱयांच्या खात्या हस्तांतरित केला. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना पैसा मिळाला असे नाही, कारण PM किसानच्या पोर्टलनुसार, 27 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या रकमेचं ट्रान्झॅक्शन फेल झाले आहे. शेतकऱ्यांच्या छोट्या चुकांमुळे त्यांना पैसे मिळाले नाही आहेत. तुम्ही आयएफएससी कोड, बँक खाते क्रमांक किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणती चूक केली असेल तर सर्वात आधी ही चूक सुधारा. जेणेकरुन पुढचा हप्ता मिळताना कोणतीही समस्या येणार नाही.

या कारणामुळे अडकतील पैसे

–शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे
–अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलात शेतकऱ्याच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी असल्यास
–आधार कार्डावरील नाव अर्जावर असणं आवश्यक
–आयएफएससी कोड चुकीचा असल्यास अडकतील पैसे
–बँक खाते क्रमांक योग्य नसल्यास पैसे अडकतील

अशी करा नोंदणी :

–पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप नोंदणी न केलेले शेतकरी अद्याप अर्ज करू शकतात.
–अशा परिस्थितीत पुढील महिन्यात त्यांना हप्ता मिळेल.
–यासाठी प्रथम आपल्याला pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
–Farmer Corner या पर्यायावर क्लिक केल्यावर New Farmer Registration पर्याय येईल.
–आपण येथे विचारलेल्या सर्व माहिती भरून स्वत: ची नोंदणी करू शकता.
–नोंदणी झाल्यानंतर पुढील हप्ता केंद्र सरकार थेट तुमच्या बँक खात्यात पाठवेल.

यादीत नाव असे चेक करा:

–यासाठी तुम्हाला आधी वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
–मग Farmer Corner पर्यायावर क्लिक करा. Farmer Corner वर जाऊन लाभार्थ्यांच्या यादीवर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल.
–तेथे तहसील आणि ब्लॉक निवडल्यानंतर आपण आपले नाव सूचीमध्ये शोधू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!