विद्यार्थी करणार प्रयोग ; बारामतीत इन्क्यूबेशन व इनोव्हेशन केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल घडून येत आहेत. त्या गतीने विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तर्फे बारामतीमध्ये बालवैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अंड इंनोवेशन अॅक्टिविटी सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. एक्सपोजर, एक्सपिरिमेंट आणि एक्सप्लेनेशन या ‘3Es’ तत्त्वावर सायन्स अंड इंनोवेशन अॅक्टिविटी सेंटर कामकाज होणार आहे.

या कार्यक्रमाबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटर द्वारे दिली आहे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, ” बारामतीतील कृषि विकास प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत उभारण्यात आलेल्या इन्क्यूबेशन व इनोव्हेशन केंद्रांचे उद्घाटन आज मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.कृषि विकास प्रतिष्ठान ही सतत नाविन्याचा ध्यास घेतलेली संस्था आहे. देश-विदेशातील उत्तम संस्थांचा अनुभव व ज्ञान यांचा उपयोग परस्पर सामंजस्याने आपल्या ग्रामीण भागासाठी कसा करता येईल याचा विचार संस्था करत असते” .

केंद्राला डॉ. आप्पासाहेब पवार यांचे नाव

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले , ” आज उद्घाटन झालेल्या केंद्राला डॉ. आप्पासाहेब पवार यांचे नाव दिले आहे. आप्पासाहेबांनी संस्थेमध्ये नाविन्य कसे येईल, संस्थेत उत्तम संशोधन कसे करता येईल यासाठी स्वतःला झोकून देऊन कार्य केले होते. त्यामुळे त्यांचे नाव या केंद्रासाठी अत्यंत समर्पक आहे. बारामतीमध्ये ‘सेंटर फॅार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची स्थापना व्हावी यासाठी माझा प्रयत्न राहील. या संस्थेत मिशनरी पद्धतीने काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक आहे. तसंच हे सगळं उभं करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्या व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो” . असा आशय शरद पवार यांनी आपल्या ट्विटर पोस्ट मध्ये दिला आहे.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष स्थानी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती .

Leave a Comment

error: Content is protected !!