Success Story : पावणे सहा एकरात 43 लाखांची कमाई; डाळिंब शेतीतून तरुण शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Success Story) घेतले जाते. डाळिंब हे उष्ण पट्ट्यातील पीक असल्याने, त्यावर येणाऱ्या काही रोगांची काळजी घेतल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची हमी असते. त्यासाठी डाळिंब पिकाचे उत्तम नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असते. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका डाळींब उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी डाळींब शेतीला आधुनिकतेसह सेंद्रिय पद्धतीची जोड देत, जवळपास पावणे सहा एकर रानातून यावर्षी 43 लाखांची कमाई (Success Story) केली आहे.

सरकारचा ‘उद्यान पंडित पुरस्कार’ जाहीर (Success Story Of Pomegranate Farming)

रुपेश गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील रहिवासी (Success Story) आहेत. आजोबा आर्मीमध्ये असल्याने निवृत्तीनंतर त्यांनी काही जमीन घेतल्याने, आपल्या कुटुंबाला मोठा आधार झाला. तसे तर आमचा आटपाडी तालुका नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो. मात्र, आपण पाण्याची कमतरता असूनही पाण्याची सुयोग्य नियोजन केले असून, पावणे सहा एकर रानात डाळिंब बाग उभी केली असल्याचे तरुण शेतकरी रुपेश गायकवाड सांगतात. दरम्यान, त्यांच्या या डाळिंब शेतीच्या यशाबद्दल त्यांना यंदाचा महाराष्ट्र सरकारचा ‘उद्यान पंडित पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

हेही वाचा : राज्यातील शेकडो शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यातील नावे! (https://hellokrushi.com/agriculture-awards-maharashtra-government-farmers/)

किती मिळाले उत्पादन?

डाळींब बागेतून यंदाच्या वर्षी पावणे सहा एकर रानातून आतापर्यंत आपल्याला एकूण 50 ते 60 टन माल मिळाला आहे. या सर्व मालाला आतापर्यंत सरासरी 125 रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. याशिवाय काही डाळिंब बागेची काढणी अजून सुरु असून, त्यातून आणखी एकूण 10 ते 12 टन माल मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी रुपेश गायकवाड सांगतात. सरासरी 125 रुपये प्रति किलोच्या दराच्या विचार करता त्यांना यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेले उत्पन्न आणि शिल्लक मालाचे उत्पन्न मिळून एकूण 43 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे ते सांगतात. त्यांना आपल्या डाळिंब बागेसाठी यंदा एकूण 9 लाखांचा खर्च झाल्याचे ते सांगतात.

कसे केले डाळिंब शेतीचे नियोजन

डाळिंब शेती करणे तितकेसे सोपे काम नाहीये. त्यावर येणाऱ्या बिब्या रोग, तेल्या, फळ कुजवा, मर रोग, तेलकट, डांबऱ्या, पिन होल बोर यासारख्या रोगांची खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा हे रोग तुमच्या संपूर्ण बागेलाच घेऊन बसतात. संपूर्ण डाळिंब बाग खराब होऊ शकते. त्यामुळे आपण डाळिंबावरील रोग नियंत्रणावर विशेष लक्ष दिले. ज्यामुळे आपले पीक सुदृढ राहण्यास मदत होऊन आपल्याला अधिकचे उत्पादन मिळाल्याचे शेतकरी रुपेश गायकवाड सांगतात. त्यांनी आपल्या पावणे सहा एकरात जवळपास पाच हजारांच्या आसपास झाडे लावले असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!