Success Story : ५० हजार रुपयांची नोकरी सोडली अन् युटूबवरून माहिती घेत सुरु केला मत्स्यव्यवसाय; होतेय लाखोंची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : काही लोक नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत तर काही लोक चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. आजकाल असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरी नको वाटती त्यामुळे ते चान्गल्या पगाराची नोकरी सोडून शेती किंवा इतर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती पाहणार आहेत. ज्याने ५० हजार रुपयांची नोकरी सोडून मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे.

बिहारमधील रहिवासी अविनाश कुमार सिंग यांनी ५० हजार रुपयांची नोकरी सोडून मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपये आहे. हे सगळं त्याच्यासाठी अशक्य होतं, पण मेहनत करण्याची जिद्द आणि काहीतरी नवीन करण्याची जिज्ञासा यामुळे ते आज या टप्प्यावर उभा आहेत . त्यांची यशस्वी शेतकरी बनण्याची कहाणी लॉकडाऊनपासून सुरू होते. आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोनाच्या काळात प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करत असले तरी प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीतून जावे लागले आहे.

YouTube ने दिला रोजगार

बिहारच्या जमुई गावातील रहिवासी अविनाश कुमार सिंग दिल्लीतील एका खासगी संस्थेत काम करत होते. कोरोना या या साथीच्या आजारामुळे कार्यालय बंद असताना ते गावी परतले. यादरम्यान फावल्या वेळात यूट्यूब पाहून रोजगार व्यवसाय करण्याचा विचार केला. कारण पारंपरिक शेती सोडून काही केले तर बरे होईल, असे त्यांना वाटत होते. यानंतर त्यांनी यूट्यूबवर मत्स्यपालनाशी संबंधित प्रत्येक बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

लाखोंची कमाई

युटूबवरून माहिती घेत त्यांनी मत्स्यपालन सुरू केले आणि त्यातून त्यांना पहिल्या वर्षी तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षीही कमाई 5 ते 8 लाखांपर्यंत वाढली. यावरून हा व्यवसाय आपल्यासाठी अधिक चांगला असल्याचे त्यांना समजले. सध्या ते तीन तलाव करून मत्स्यपालन करत आहेत. मात्र येत्या काही दिवसांत चार एकरात तलाव बांधून माशांचे संगोपन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर यूट्यूबवरून मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घेऊन विविध जातींच्या माशांचे संगोपनही करत आहे. अविनाश कुमार सिंग सांगतात की, यावर्षी त्यांनी भरपूर मत्स्यशेती केली आहे. यामुळे ऑक्टोबरपासून पुढील 3 महिन्यांत 15 लाख रुपयांचे उत्पन्न होऊ शकते.

View Post

मत्स्यव्यवसायासाठी मिळतंय अनुदान, असा घ्या लाभ

शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी अनुदान देखील सरकार देत आहे. या अनुदानाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल करा. या अँपच्या माध्यमातून तुम्ही याबाबत सर्व माहिती घेऊ शकता त्यामुळे लगेचच हे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.

error: Content is protected !!