Sugarcane FRP : शेतकऱ्यांसाठी ऊस गोड; केंद्र सरकार कडून FRP मध्ये वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 2022- 2023 या साखर हंगामासाठी उसाला प्रति टन ३०५० रुपये एफआरपी (Sugarcane FRP) केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

उताऱ्यानुसार दिली जाणार रक्कम

प्रतिटन ३०५० रुपये हा दर 10.25% साखर उताऱ्याला आहे. त्यापेक्षा जास्त अथवा कमी उतारा असल्यास दर कमी किंवा जास्त होईल प्रत्येक 0.1% वाढीव उताऱ्या मागं प्रतिक्विंटल तीनशे पाच रुपये वाढीव तर प्रत्येकी 0.1% कमी उतारा मागे प्रत्येक क्विंटल तीनशे पाच रुपये कमी भाव मिळेल.

पाच कोटी ऊस उत्पादकांना फायदा

उसाच्या भावात वाढ करण्याच्या निर्णयाचा देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ (Sugarcane FRP) होणार आहे साखर कारखाने आणि इतर पूरक उद्योगातून पाच लाख कामगारांना रोजगार मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.

आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर

सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या एफआरपीला मान्यता दिली आहे. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक भाव 305 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (CCEA) ही माहिती दिली आहे. खरेदी दरात प्रति टन 150 (Sugarcane FRP) रुपयांची वाढ सरकारनं केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. त्यामुळं सरकारनं गेल्या आठ वर्षांत एफआरपीमध्ये 34 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!