Sugercane FRP : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात उसाच्या एफआरपीमध्ये (Sugercane FRP) तब्बल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हजणेच यंदा उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन असा दर मिळणार आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शिवाय दर स्थिर असतानाही उसाच्या क्षेत्रात वाढ होत होती आता अधिकच्या दरामुळे उसाचे क्षेत्र देखील वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

गतवर्षी वाढत्या उत्पादनामुळे हंगाम लांबणीवर पडला होता. दिवसेंदिवस उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे दराबाबत साशंका वर्तवली जात असतानाच केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच (Sugercane FRP) नाहीतर मराठवाड्यात देखील उसाचे क्षेत्र वाढत आहे. देशात सर्वाधिक उसाचे गाळप हे महाराष्ट्रात होत असल्याने त्याचा फायदाही राज्यातील शेतकऱ्यांनाच अधिक प्रमाणात होणार आहे. गेल्या चार वर्षापासून ‘एफआरपी’ च्या दरात वाढ होत आहे. केंद्राने आता साखरेच्या किमान विक्री दरातही वाढ करण्याची मागणी होत आहे.

उसक्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता

ऊस उत्पादनावरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त होते. आता दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना (Sugercane FRP) मोठा दिलासा मिळाला आहे. सन 2019-20 पासून सुरु असलेली वाढ यंदाही कायम राहिलेली आहे. रास्त आणि किफायतशीर दर मिळत असल्याने आता पुन्हा ऊस क्षेत्रात वाढ होणार असा अंदाज आहे. 2019-20 मध्ये एफआरपी 2 हजार 750 एवढा होता तर 2020-21 मध्ये 2 हजार 850 तर गतवर्षी 2 हजार 900 व यंदा तो 150 रुपायांनी वाढून थेट 3 हजार 50 वर येऊन ठेपला आहे.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!