उन्हाळी सोयाबीन बहरात ; सद्य स्थितीत अशा पद्धतीने पिकाची घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उन्हाळी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. सध्याचे पीक बघता पीकही चांगले आलेले दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगा लागलेल्या दिसून येत आहेत आजच्या लेखात आपण सध्याची सोयाबीन पिकाची स्थिती आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती करून घेऊयात

— शेतकरी मित्रांनो काही भागात सोयाबीनला शेवटचे पाणी देण्याची तयारी सुरू आहे असं असताना पाट पाण्यातून एकरी दहा किलो म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच पांढरे पोटॅश याचा वापर करावा त्यामुळे दाणे चांगले भरले जातात.

— झाडांची मुळी चालू असल्यामुळे पालाश शोषण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी आपण घेत असतो त्यामुळे आपणास या फवारणीचा फायदा हा दाणे भरण्याच्या अवस्थेत होणार आहे. काही क्षेत्रावर सोयाबीनची पाने वाढू लागतात अशा वेळी झाडांची मुळी बंद झाली आहे असे समजावे. त्यामुळे अशा वेळी म्युरेट ऑफ पोटॅश एक किलो प्रति एकर या प्रमाणात फवारणी केल्यास जमिनीतून पालाश या अन्नद्रव्यांचा अपव्यय होत नाही.

— शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या झाडाची पाने वाळू लागतात तेव्हा सोयाबीन मळणी चे नियोजन करणे गरजेचे आहे.

— मळणी सुरू करायच्या आधी सध्याचे हवामान कसे आहे ते कसे राहील याचा अंदाज घेणे महत्त्वाचा आहे. हा अंदाज घेऊनच काढणीचे नियोजन करावे

— मळणी पुर्वी ताडपत्री बारदान आणि इतर सामग्री तयार ठेवावी.

— सध्या अवकाळी पावसाच्या सूचना हवामान खात्याकडून येत आहेत त्यामुळे काढणी केलेल्या सोयाबीन पावसाने भिजणार नाही याची काळजी आवर्जून शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.

–उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत.

Leave a Comment

error: Content is protected !!