परभणीच्या कृषी विद्यापीठात उन्हाळी सोयाबीनचे प्रयोग; जाणून घ्या वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात पारंपरिक शेतीबरोबरच काही वेगळे प्रयोग शेतीमध्ये करण्यास प्राधान्य दिले जात आहे. कृषी विद्यापीठांचा देखील यात मोलाचा वाटा आहे. परभणीतील कृषी विद्यापीठाने उन्हाळी सोयाबीन बीजउत्पादन यावर प्रयोग सुरु केला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. हे पाहता हा प्रयोग यशस्वी ठरला तर शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

याबाबत विद्यापीठाने सांगितले की आम्ही विद्यापीठ कार्यक्षेत्रात उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन लागवड चाचण्यांचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. या सोयाबीनची लावण डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीचा पंधरवडा या कालावधीत केलेली फायदेशीर ठरते. पिकाच्या वाढीसाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान असणे गरजेचे असते. तसेच संरक्षित पाण्याची सोय देखील असावी लागते. जानेवारी व फेब्रुवारीच्या सुरुवातीस प्रत्येकी १० ते १२ दिवसांनी पाणी देता येते. मात्र फेब्रुवारीनंतर तापमान वाढत असल्याने आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. आमच्या विद्यापीठाच्या एमएयूएस ६१२, एमएयूएस १५८ आदी जातींचे प्रयोग आम्ही घेत आहोत.

उन्हाळी सोयाबीनची वैशिष्ट्ये

–उन्हाळी सोयाबीनचा फायदा म्हणजे काढणीच्या वेळी पाऊस येत नाही.
–याच्या बियाण्याची उगवणशक्ती चांगली म्हणजे ८५ ते ९० टक्के असते. त्यामुळे खरिपात लावण करताना त्याचा फायदा होतो.
–या सोयाबीनमध्ये दाण्यांचा आकार मात्र कमी राहतो.
–खरिपातील सोयाबीनच्या १०० दाण्यांचे वजन ११ ते १३ ग्रॅम असेल, तर उन्हाळी सोयाबीनच्या दाण्यांचे वजन ८० ते १० ग्रॅमपर्यंत राहते.
–दाण्यांचा आकार कमी असल्याने प्रति एकर झाडांची संख्याही वाढू शकते.
–एकरी २० ते २२ किलो बियाणे पुरेसे होते.

 

Leave a Comment

error: Content is protected !!