एकरकमी एफआरपी साठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ; कारखान्यावर काढली मोटारसायकल रॅली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने एफआरपी ची रक्कम तुकड्यांमध्ये देण्याचा निर्णय घातला आहे. त्यातच राज्यातील काही कारखान्यांनी मागील थकीत एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून स्वाभिमानाने आंदोलन केले आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली उदगीरी कारखान्यांवरून प्रारंभ झाला. त्यानंतर तुरची तासगाव, क्रांती कुंडल, हुतात्मा वाळवा ,राजारामबापू साखराले , सोनहिरा वांगी अशी रॅली काढण्यात आली.

काय आहेत मागण्या ?

–एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे
— वजना तील काटा मारी बंद झाली पाहिजे
— तोडीला मोजाव्या लागणाऱ्या पैशाची पद्धत बंद झाली पाहिजे
— महापुरात बुडालेला ऊस प्राधान्याने तोडला पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

अन्यथा संघर्ष अटळ

सर्व साखर कारखान्याना याना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले की शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी एकरकमी एफआरपी जाहीर केली असताना सागली जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन तोडतुन ब्र हि काढायला तयार नाहीत, लवकरच एकरकमी एफआरपी जाहीर करण्यात यावी .अन्यथा संघर्ष अटळ आहे, सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर करावी,यावेळी टोळीला द्यावी लागणारी पैशाची पध्दत बंद करावी. पुरबाधित ऊस तोडणी प्रथम प्राधान्याने तोडीणी करावे. या सह विविध मागणी चे निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!