वाढत्या उष्णतेपासून घ्या पिकांची काळजी ; वाचा कृषी सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 08 ते 10 मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 08 ते 10 मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेल्या हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी : कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

चिकू : बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

आंबे बहार: कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबे बहार डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज व खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भेंडी पिकावरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रीड 20% एसपी 1.5 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% ईसी 23 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल 2 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नागअळीच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलीप्रोल 10.26% ओडी 18 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

vegitables

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

flowers

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

किटक संगोपन गृहालगत 10 फुट अंतरावर चारही बाजूने तुती वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी. त्यामूळे 5 अं. से. तापमान कमी मदत मिळते. कच्च्या शेडनेट गृहातील तापमान 28 अं.से. च्यावर जाता कामा नये. हिवाळयात 20 अं.से. च्या खाली व उन्हाळयात 35 अं.से. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक पाने खात नाहीत. तुती पाने खाण्याची ‍क्रिया मंदावते. किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास बळी पडतात. त्यामूळे उन्हाळयात 3 ते 4 वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व रॅकवर निळी नायलॉन जाळी किंवा निळी पॉलीथीन पट्टी आच्छादन करावे. आतील चारही बाजूने 22.5X 15 सेंमी लांबी खोलीची नाली असावी. वरच्या बाजूस सिमेंट पत्रे किंवा बेंगलोर टाईल्स टाकून त्यावर कोल्ड गार्ड पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान 5 ते 7 अं.से ने कमी होते.

Leave a Comment

error: Content is protected !!