पावसाळ्यात अशी घ्या मोसंबी बागेची काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो जसे कि आपल्याला माहीत आहे ,जुन- जुलै महिन्यातील पावसाने बगीच्याचा ताण तुटतो. झाडाला नविन पालवी फुटते. या काळात वातावरणातील आद्रता व दमट – उष्ण हवामान किडी व रोगाच्या प्रादुर्भावास पोषक ठरते. पावसाळ्यात बगीच्यातील सखल जागी पाणी दिर्घकाळ साचुन राहते जे झाडास अपायकारक ठरते, कारण अशा स्थितीत ‘फायटोप्थोरा’ नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा पुढील शिफारस केलेल्या उपाय योजनांची गरजेनुसार अंमलबजावणी करणे लाभदायक व फायदेशीर ठरु शकतं .

कशी घ्यावी काळजी

– फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन पहिल्या पावसाआधी झाडांच्या बुंध्यावर बोर्डो पेस्टचा लेप लावाव.
– झाडाच्या बुडाजवळ पाणी साचु देऊ नये.पाणी साचुन असल्यास व मोसंबी झाडाच्या दोन ओळींमध्ये उताराच्या विरुद्ध दिशेने इंग्रजी अक्षर ( V ) च्या आकाराचे चर खोदावेत. जेणेकरुन पाण्याचा निचरा लवकरात लवकर व प्रभावीपणे होईल. झाडाच्या आळ्यात पाणी साचु नये म्हणुन झाडाखालील जमीन सपाट करावी. ठिबक सिंचनाच्या नळ्या गुंडाळुन ठेवाव्यात.

Leave a Comment

error: Content is protected !!