बार, हॉटेल मालकांची दखल घेतली त्या प्रमाणे सामान्य शेतकऱ्यांची घ्या ! रक्षा खडसे यांचं शरद पवारांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन मुळे शेतकरीवर्ग पुरता वैतागला. अशा स्थितीत संकटात सापडलेला शेतकरी तसेच राज्याच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी अशी मागणी पत्राद्वारे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केली आहे. ‘ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्रातील बार आणि हॉटेल मालकांची तात्काळ दखल घेतली त्या प्रमाणात सामान्य शेतकरी, शेतमजूर यांची देखील दाखल घ्यावी असे पत्राद्वारे म्हंटले आहे.

शेतात ओतलेला पैसा मातीत गेला

या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, “गेली वर्षभर कोविड महामारी मुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि जिल्हा बंदीमुळे शेतकरी संकटात सापडलाय शेतीमालाला भाव मिळत नाही. केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही. जिल्हा बंदीमुळे वाहतूक बंद, बाजार समित्या बंद आहेत. हाताशी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभे पीक नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतात ओतलेला पैसा मातीत गेला असून शेतकरी कधी नव्हे एवढा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्यानं नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणे देखील शेतकऱ्यास कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी सरकार कडून काही काळाची सवलत मिळावी यासाठी आपल्या स्तरावरून पाठपुरावा व्हावा” असं रक्षा खडसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे

बार आणि हॉटेल व्यवसायिकांप्रमाणे शेतकरी देखील संकटात सापडला असून वीज बिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही. शेतकर्यांच्या थकित वीज बिलात 33 टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिक विमा च्या योजना शेतकऱ्यांना पासून लांबच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेला नाही लॉक डाऊन मुळे जेव्हा इतर सर्व उद्योग धंदे बंद होते. तेव्हा शेतकरी मात्र शेतात राबून पीक घेत होता टाळे बंदीच्या काळातही शेती आणि शेतीपूरक उद्योग ग्रामीण कुटुंबासाठी आधार असल्याने राज्य सरकारनं या उद्योगधंद्यांत प्रवाह शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावं. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणात तातडीने सहा हजार रुपये जमा करावेत व तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी शेतकऱ्यांसोबत शेतमजूर बारा बलुतेदार वाजंत्री वाले आणि हातावर पोट असणाऱ्या कष्ट करण्यास मदत करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा व्हावा.

” दूध, द्राक्षे ,कांदा, भाजीपाला, केळी, आंबे, फळे, फुले आदी शेतमालाच्या बाजारपेठा टाळेबंदी मुळे बंद झाल्याने रोजच्या उत्पन्नाला शेतकरी मुकला आहे महाविकास आघाडी सरकारने केलेली सरसकट कर्ज मुक्तीची घोषणा ही सध्या वाऱ्यावर आहे. तरी ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्रातील बार आणि हॉटेल मालकांची तात्काळ दखल घेतली त्या प्रमाणात सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्री वाले आणि हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोशही महा विकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पर्यंत पोहोचवून या कठीण काळात थोडाफार का होईना दिलासा द्यावा ही विनंती”. असे म्हणत रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहिले आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!